आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde News In Marathi, Ahmednagar, Divya Marathi

शाडूच्या शिल्पाच्या माध्‍यमातून मुंडेंना श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे दोन फूट उंचीचे शाडूचे शिल्प साकारून प्रसिद्ध शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे यांनी त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली. महावीर कलादालनात शनिवारी हा कार्यक्रम झाला.

कांबळे म्हणाले, मुंडे यांच्या प्रत्यक्ष भेटीचा दोन-तीन वेळा योग आला, परंतु निवांत चर्चा करण्याची संधी मला मिळाली नाही. मुंडे यांना कला आणि कलावंतांबद्दल विशेष प्रेम होते. त्यामुळे शिल्पकृतीद्वारे त्यांना मी आदरांजली वाहणार आहे. अवघ्या काही मिनिटांत त्यांनी हे शिल्प साकारले. उपस्थित असलेली ‘कला जगत’ची शिबिरार्थी मुले-मुली व अन्य मान्यवर मुंडे यांचे हे हुबेहूब शिल्प पाहून अवाक् झाले.

गेली पंधरा दिवस सुरू असलेल्या या शिबिरात मुलांनी तयार केलेल्या चित्र, स्टोन पेंटिंग, प्लेट पेंटिंग, मास्क, शिल्प यांचे प्रदर्शन 8, 9 व 10 जून या कालावधीत महावीर कलादालनात भरवण्यात येणार आहे. ते सर्वांसाठी खुले आहे. रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन कला जगतच्या संचालिका स्वाती कांबळे, शिबिर संयोजक शुभंकर कांबळे व मोना कांबळे यांनी केले आहे.

मंगेश तेंडूलकर आज नगरमध्ये
कला जगतच्या शिबिराचा समारोप रविवारी (8 जून) सायंकाळी 4 वाजता महावीर कलादालनात होणार आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर, जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे व मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी मंगेश तेंडूलकर व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिकही दाखवणार आहेत.