आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोपीनाथ मुंडे हे ख-या अर्थाने होते अनाथांचे नाथ- दादासाहेब मुंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नाव ठेवण्यामागे काही हेतू असतात. गोपीनाथ मुंडे यांनी आपले नाव सार्थ ठरवत अनेक अनाथांना आधार दिला. त्यांचे ते नाथ झाले. अनाथांचे नाथ म्हणून मुंडे यांची एक वेगळी ओळख आहे, असे प्रतिपादन बीड येथील दादासाहेब मुंडे यांनी केले.
सारसनगर येथे भगवान बाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ट्रस्टचे अध्यक्ष बबन घुले, मच्छिंद्र दहिफळे, भैरव पालवे, संदीप ढाकणे, अर्जुन दहिफळे, भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष भीमराज आव्हाड, लोहसरचे सरपंच अनिल गिते, भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सागर कराळे, उद्धव ढाकणे, भगवान आव्हाड आदी या वेळी उपस्थित होते.गोपीनाथ मुंडे यांचे बालपण, शालेय जीवन, राजकीय प्रवासातील चढउतार, प्रमोद महाजन यांच्याशी असलेली मैत्री, सरपंचपदापासून ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री असा झालेला त्यांचा प्रवास या घटनांचा सविस्तर आढावा या वेळी घेण्यात आला. व्याख्यानास अजय दहिफळे, चैतन्य घुले, सोमनाथ आव्हाड, जालिंदर दहिफळे व राजेंद्र कुटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.