आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी विसावली ‘जायकवाडी’मध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - तब्बल११२ दिवस कोरड्या असलेल्या प्रवरासंगम येथील गोदावरी पात्रातून दक्षिणगंगा गोदावरी नदी जायकवाडी जलाशयात विसावली आहे. नाशिक, कोपरगाव परिसरात गेल्या दोन दिवस झालेल्या पावसाने गोदावरीला महापूर आला. दारणा, नांदूर, मध्यमेश्वर आदी धरणे भरून ओव्हरफ्लो झाली. या धरणांमधून ३० ३१ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीला पूर आला. नदीकाठची प्रवरासंगम, गळनिंब, सलाबतपूर, मंगळापूर, शिरसगाव, वरखेड, दहिगाव अशी अनेक गावे गोदावरीच्या जायकवाडीतील जलाशयावर पिण्यासाठी अवलंबून आहेत. या सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. घोगरगाव १८ गावे, नेवासे शहर तीन गावे, तसेच गळनिंब २० गावे शिरसगाव अशा जीवन प्राधिकरणाच्या चार मोठ्या योजना बंद पडायला लागल्या होत्या. त्या आता पुन्हा चालू होतील. मंगळवारी सकाळी गोदामाईने जैनपूर, घोगरगाव येथे नेवासे तालुक्यात प्रवेश केला. त्यानंतर सकाळी दहा प्रवरासंगमच्या पुलाला पाणी येऊन धडकून जायकवाडीत मिसळले.
बातम्या आणखी आहेत...