आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - महागाई भत्त्याची 35 महिन्यांची थकबाकी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी संघटना 20 व 21 फेब्रुवारीला देशव्यापी संप करणार आहेत. या संपाच्या प्रचाराला सोमवारपासून (11 फेब्रुवारी) जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष योगिराज खोंडे यांनी दिली.
संपाच्या पूर्वतयारीसाठी रविवारी संघटनेच्या कार्यालयात आयोजित बैठकीत खोंडे बोलत होते. संघाचे अध्यक्ष जी. एस. जगताप, तलाठी संघटनेचे अध्यक्ष नाना वायकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खोंडे म्हणाले, महागाई भत्त्याची 35 महिन्यांची थकबाकी द्यावी, केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचार्यांना वाहतूक व शैक्षणिक भत्ता द्यावा, सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीवरून आगाऊ वेतनवाढीबाबत निर्णय घ्यावा यासह 16 मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी 20 व 21 फेब्रुवारीला संप करणार आहेत. राज्य कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत चर्चा होऊनही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. संप यशस्वी करण्यासाठी 11 ते 15 फेब्रुवारीदरम्यान प्रचार करण्यात येणार आहे. बुधवारी शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये संघटनेचे पदाधिकारी जाऊन टेबल टू टेबल संपाचा प्रचार करतील.
या संपात वैद्यकीय संघटना, कामगार संघटना, घरेलू कामगार संघटना, एलआयसीमधील कर्मचारी, तसेच शिवसेना व इंटकच्या संघटना सहभागी होणार आहेत. संपाच्या प्रचारासाठी 30 जणांची नेमणूक करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारीला गांधी मैदानापासून संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे, असे खोंडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.