आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Hurry For Private Money Lenders Repayment Vikhe

सरकारला सावकारांच्याच कर्जमाफीची घाई - विखे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहाता - हवामानातील बदलामुळे कृषिक्षेत्रापुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचा दिलासा नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यापेक्षा सावकारांचे कर्ज माफ करण्याची सरकारला घाई झाली अाहे, अशी टीका विराधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.

तालुक्यातील नांदूर येथे ५८ लाख खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनप्रसंगी विखे बोलत होते. ते म्हणाले, पिण्यासह शेतीच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर होणार आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने धरणात मुबलक साठा नाही. सन २००५ मध्ये करण्यात आलेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्याची अंमलबजावणी २०१३ मध्ये सुरू झाली. याचे परिणाम आज भोगावे लागत आहेत. हक्काचे पाणी गेल्याने लाभक्षेत्रातील शेती उद््ध्वस्त होत आहे. पाण्याच्या प्रादेशिक वादात सरकारने समन्वय साधायला हवा होता, असे मत विखे यांनी व्यक्त केले.

हवामानावर आधारित पीकविमा योजनेची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यापेक्षा सावकारांच्या कर्जाची चिंता सरकारला अधिक असल्याची टीका विखे यांनी केली. याप्रसंगी सभापती बेबीताई आगलावे, उपसभापती दीपक तुरकणे, तहसीलदार सुभाष दळवी, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, जि. प. सदस्य राजेंद्र लहारे, सुरेखा इनामके, सरपंच प्रीतम गोरे, उपसरपंच नयनश्री गोरे, डॉ. संपत शेळके उपस्थित होते.

सामूहिक विवाह सोहळ्याचा ठराव करा
ग्रामीण भागात विवाह सोहळ्यावर होणारा खर्च कमी करावा. जेवणावळीवर अधिक खर्च करता पाहुण्यांना पेढा देऊन साध्या पद्धतीने विवाह सोहळा करावा. २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभांमधून सामूहिक विवाह सोहळा करण्याचे ठराव करा. याबाबत प्रत्येक गावातील सरपंचाला पत्र पाठवून ठराव करण्याबाबत सूचित करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.