आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Lawyer Ujjwal Nikam Met To Divyamarathi

अनपेक्षित धक्क्यांनी सरकारी वकिलांनी विचलित होऊ नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गंभीरगुन्हे मोठ्या खटल्यात अनपेक्षित धक्के घटना ठरलेल्या असतात. अशा वेळी सरकारी वकिलांनी विचलित होता खटला यशस्वी करण्यासाठी काम करावे, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

दैनिक दिव्य मराठी कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीत गुरुवारी दुपारी निकम यांनी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. मालेगाव बॉम्बस्फोटातील हिंदू आरोपींच्या विरोधातील खटला सौम्यपणे हाताळा, असा दबाव गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) टाकला जात असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी नुकताच केला होता. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अॅड. निकम बोलत होते. ते म्हणाले, मोठे खटले चालवण्याची एक व्यवस्था आहे. असे खटले चालवताना काही अनपेक्षित धक्के घटना घडणे अपेक्षितच असते. त्याचा कोणताही परिणाम होऊ देण्याची काळजी संबंधित सरकारी वकिलांची असते. असे धक्के घटनांचा वकिलांनी बाऊ करता कामा नये. अॅड. सालियान यांनी केलेल्या आरोपातून दोन समाजांतील दरी वाढण्याबरोबरच सरकारबाबत दोन समाजांची मते साशंक होण्याचा धोका असतो. मोठे खटले चालवताना जबाबदारीही मोठी असते. अशा वेळी विचलित होता पूर्वतयारीने सरकारी वकिलांनी खटला जिंकण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत अॅड. निकम यांनी व्यक्त केले.

फौजदारी न्यायप्रक्रिया जलद झाली असून खून, दरोडे, बलात्कार आदी गंभीर गुन्ह्यात एक ते दीड वर्षात निकाल लागत आहेत. फौजदारीच्या तुलनेत दिवाणी न्यायप्रक्रिया अधिक वेळखाऊ आहे. अशा खटल्यांमध्ये नव्याने येणारे मुद्दे, त्यावरील अपील यामुळे निकाल लागण्यास विलंब होतो. फौजदारी खटल्यातील गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपींना तातडीने निकालपत्राची प्रत देण्याची व्यवस्था आवश्यक आहे. निकालपत्र मिळण्यास झालेल्या विलंब, तसेच त्याच्या आर्थिक ताकदीमुळे त्याने तयार ठेवलेल्या वकिलांच्या फौजेचा फायदा अभिनेता सलमान खान याला जामीन मिळण्यात झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ललित मोदी बदमाश
आयपीएलचेमाजी अध्यक्ष सध्या लंडनमध्ये बसून ट्विटरद्वारे रोज आरोपांच्या नवनवीन फैरी झाडणारे ललित मोदी बदमाश असून स्वत: आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले मोदी रोज नवनवीन नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत आहेत, असे मत अॅड. निकम यांनी व्यक्त केले. मोदी काहीही बोलले, तरी त्याच्या राष्ट्रीय बातम्या होत असून दिवसभर या बातम्यांचा मारा केला जातो. यातून दोन प्रमुख पक्ष परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. देशभरात नकारात्मकता यातून पसरत आहे, असे त्यांनी सांगितले.