आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government News In Marathi, 3 Lakh People Registrant For Adhara Card, Divya Marathi

नगर शहरात तीन लाख नागरिकांची आधार नोंदणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरात तीन लाख 195 नागरिकांनी आधार नोंदणी केली आहे. महापालिका हद्दीत 10 जानेवारी 2011 पासून आधार नोंदणीला सुरुवात झाली होती. शहरात आधार नोंदणीच्या पहिल्या टप्प्याचे काम विप्रो इन्फोटेक कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने 1 लाख 10 हजार 621 नागरिकांची, टेरा सॉफ्टवेअर कंपनीने 1 लाख 8 हजार 716, महाऑनलाइन कंपनीने 76 हजार 610 नागरिकांची, टीम लाईफ केअर कंपनीने 1 हजार 248 नागरिकांची नोंदणी केली होती. आतापर्यंत 3 लाख 195 नागरिकांनी आधारची नोंदणी केली. दुसर्‍या टप्प्यातील नोंदणी जुनी महापालिका कार्यालय, महापालिका प्रभाग समिती कार्यालय, प्रगती कॉम्प्युटर, गायकवाड मळा व प्रेमदान चौक येथे सुरू आहे.