आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणांपलीकडे सरकार काहीच करत नाही - राधाकृष्ण विखे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महात्मा फुले जलभूमी अभियान यापूर्वीच्या सरकारचे होते. आताच्या सरकारने या नावात बदल करुन जलयुक्त शिवार अभियान नाव दिले. योजनेचा गवगवा सरकारकडून केला जात असताना वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जात नाही. सरकार घोषणांपलीकडे काहीच करत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही. केवळ घोषणा करणारे हे सरकार आहे, ही शोकांतिका आहे. खरीप हंगामात कापसाचे ३२ लाख हेक्टर क्षेत्र पूर्णपणे उद््ध्वस्त झाले. कापसाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांना अनुदान नाही. सरकारने सांगावे किती गावांत जलयुक्त शिवार अभियानातून किती टीएमसी पाणी उपलब्ध झाले. गावनिहाय माहिती द्यावी. सरकार जलयुक्त शिवार अभियानातून दिशाभूल करत आहे, असा आरोप विखे यांनी केला.