आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Officer Dream Is Complete Of Kashinath Kardile

सनदी अधिकारी होण्याचे वडिलांचे स्वप्न केले पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुलानेसनदी अधिकारी होऊन गोरगरिबांची सेवा करावी, असे काशीनाथ कर्डिले (गेवराई, ता. नेवासे) यांचे स्वप्न होते. वडिलांचे हे स्वप्न राहुल यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पूर्ण केले आहे. यापूर्वी तीन वेळा त्यांच्या मुलाखती झाल्या, मात्र निवड होऊ शकली नव्हती. चौथ्यांदा मात्र त्यांनी यश संपादन केले.

राहुल कर्डिले यांनी यूपीएससी परीक्षेत देशात ४२२ क्रमांक मिळवला आहे. राहुल यांचे वडील काशीनाथ रायभान कर्डिले हे रयत शिक्षण संस्थेत शिक्षक होते. १९९७ मध्ये त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर जिद्द चिकाटीच्या जोरावर राहुलने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणगाव (ता. सिन्नर) येथे, तर माध्यमिक शक्षण करंजी (ता. पाथर्डी ) येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण नगरच्या विखे महाविद्यालयात झाले. सध्या ते कोल्हापूर येथे जिल्हा उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी तीन वेळा त्यांच्या मुलाखती झाल्या, मात्र यश आले नाही. चौथ्यांदा मात्र त्यांना यश मिळाले.त्यांचे मेहुणे महेश जिवडे हे पुणे येथे आयकर उपायुक्त आहेत. त्यांच्या प्रेरणेतून राहुल यांनी हे यश मिळवले. राहुल यांची पत्नी प्रियंका कर्डिले गेल्या वर्षी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या कोल्हापूरला उपजिल्हाधिकारी आहेत.


कष्टाचे चीज झाले
^राहुलने सनदी अधिकारी होऊन गोरगरिबांची सेवा करावी, अशी वडिलांची इच्छा होती. लहानपणापासून तो अभ्यासात हुशार होता. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्याने केलेल्या कष्टाचे चीज झाले. शासकीय सेवेच्या माध्यमातून त्याने गोरगरिबांना लाभ मिळवून द्यावा. सामान्य कुटुंबातून आलेला मुलगादेखील जिद्दीच्या जोरावर सनदी अधिकारी होऊ शकतो, हे राहुलने दाखवून दिले आहे.'' संदीपकर्डिले, बंधू

अधिका-यांकडून घेतली प्रेरणा
यापूर्वीतीन वेळा यूपीएससी परीक्षेच्या मुलाखती दिल्या, मात्र यश आले नाही. अपयश आल्यानंतरदेखील आई, भाऊ बहिणीने आधार देत पुन्हा एकदा प्रयत्न कर,असे सांगितले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. अशा परिस्थितीत नोकरी करू नको, अभ्यास कर असे घरातून सांगितले जायचे. त्यांच्या या पाठबळामुळे ही परीक्षा मी उत्तीर्ण झालो. नगरला असलेले तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांचे काम पाहून आपण अधिकारी व्हावे, असे वाटत होते. त्यांची प्रेरणा घेऊन मी वाटचाल केली. मला केवळ अधिकारी व्हायचे नाही, तर समाजासाठी काही तरी करून दाखवयाचे आहे.'' राहुल कर्डिले,