आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची दुसऱ्या स्तराची सरमिसळ प्रक्रिया केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्या वेळी कवडे बोलत होते. ते म्हणाले, मतदारसंघनिहाय सर्व कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना आदेशही देण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण गुरुवारी (९ ऑक्टो‍बर) सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही केंद्रीय निवडणूक निरीक्षकांसमवेत घेण्यात आली. या बैठकीस राष्ट्रवादी, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, तसेच आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांना मतदान केंद्राच्या यादीचे वाटप करण्यात आले.

मतदान यंत्रांच्या दुसऱ्या स्तराची सरमिसळ प्रक्रिया सोमवारपासून (६ ऑक्टोबर) सुरू होणार आहे. सर्व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आप‍ल्या संबंधित ठिकाणी या वेळी उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदानयंत्रावर मतपत्रिका लावून ईव्हीएम मशीनचे सिलिंग शुक्रवारी (१० ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता संबधित विधानसभा मतदारसंघाच्या तहसील कार्यालयांच्या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांनी उपस्थित राहावे. निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत शनिवारी ( ११ ऑक्ट‍ोबर) दुपारी वाजता नियोजन भवनात आयोजित करण्यात आले आहे, असे कवडे यांनी सांगितले.
नगर शहर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारांच्या छायाचित्र मतदार चिठ्ठ्या (व्होटर स्लीप) वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघर छायाचित्र मतदार चिठ्ठ्या वाटप करणार आहेत. तेव्हा प्रत्येक घरातील कुटुंबापैकी कोणीतरी या चिठ्ठ्या स्वीकाराव्यात. नगर मतदारसंघात व्हीव्हीपॅट ही नवीन कार्यप्रणाली राबवण्यात येणार आहे. सावेडी, भिस्तबाग, नागापूर, नालेगाव, भिंगार, चाहुराणा बुद्रुक, केडगाव येथील तलाठी कार्यालयात रविवारी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.” - वामन कदम, निवडणूक निर्णय अधिकारी.
तालुका तारीख वेळ ठिकाण
-अकोले ६ ऑक्टोबर सकाळी १०.०० तहसील कार्यालय
-संगमनेर ६ ऑक्टोबर दुपारी १.०० तहसील कार्यालय
-कोपरगाव ६ ऑक्टोबर सायं. ४.०० तहसील कार्यालय
-राहाता ७ ऑक्टोबर सकाळी १०.०० तहसील कार्यालय
-श्रीरामपूर ७ ऑक्टोबर दुपारी १.०० तहसील कार्यालय
-नेवासे ७ ऑक्टोबर सायं. ४.०० तहसील कार्यालय
-राहुरी ६ ऑक्टोबर सकाळी १०.०० तहसील कार्यालय
-शेवगाव ६ ऑक्टोबर दुपारी १.०० तहसील कार्यालय
-नगर ६ ऑक्टोबर सायं. ४.०० तहसील कार्यालय
-पारनेर ७ ऑक्टोबर सकाळी १०.०० तहसील कार्यालय
-श्रीगोंदे ७ ऑक्टोबर दुपारी १.०० तहसील कार्यालय
-कर्जत ७ ऑक्टोबर सायं. ४.०० तहसील कार्यालय