आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

682 पाणी योजनांची 67टक्के थकबाकी शासनाने भरली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पाणी योजनांची 33 टक्के थकबाकी ग्रामपंचायतीने भरल्यानंतर उर्वरित 67 टक्के थकबाकी शासनाने भरली आहे. सहा महिन्यांत 682 योजनांच्या थकबाकीपोटी 97 लाख 82 हजार 859 रुपयांचा भरणा शासनाने केला.

विजेच्या थकबाकीमुळे अनेक योजना बंद होत्या. योजना सुरळीत चालवण्यासाठी सरकारने 2012 मध्ये धोरणात्मक निर्णय घेतला. त्यानुसार ज्या ग्रामपंचायती 33 टक्के थकबाकी भरतील, त्यांची उर्वरित 67 टक्के थकबाकी शासन भरणार आहे. भरणा शासनाच्या वाट्याला आलेल्या 67 टक्के रकमेपैकी 17 टक्के रक्कम नैसर्गिक आपत्ती निधीतून, तर 50 टक्के रक्कम देखभाल दुरुस्तीच्या निधीतून देण्याचे ठरले होते.

जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर 2012 या कालावधीत 682 योजनांवर 1 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी होती. संबंधित ग्रामपंचायतीने शासनाच्या योजनेचा लाभ घेत 33 टक्के म्हणजे 48 लाख 18 हजार 411 रुपयांचा भरणा केला. उर्वरित 67 टक्के 97 लाख 82 हजार 859 रुपये शासनाने भरले. त्यामुळे या योजना पुन्हा सुरळीत सुरू होऊ शकल्या आहेत. यात 24 लाख 82 हजार 218 (17 टक्के) रुपयांचा आपत्ती निधी, तर 73 लाख 672 रुपयांच्या देखभाल निधीचा समावेश आहे.