आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Policy Different For Maratha Reservation Vinayak Mete

मराठा आरक्षणाबाबत सरकारचे धोरण वेगळे - विनायक मेटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मराठा आरक्षणाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करून त्यात 25 टक्के आरक्षण मिळावे, असा आमचा आग्रह आहे. तथापि, सरकारचे धोरण वेगळे असल्याचा संशय आहे. निवडणुकांच्या तोंडावर स्वतंत्र प्रवर्ग तयार करून मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा डाव आहे. तसे झाले तर आरक्षणाच्या नावाखाली पाने पुसण्याचा प्रकार होईल, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार व शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांनी मंगळवारी केली. येथे पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते.
मेटे म्हणाले, आरक्षणासंदर्भात राणे समितीने नागरिकांची मते जाणून घेतली आहेत; पण काहीच होणार नाही. सर्वांगीण सर्वेक्षणानेच आरक्षणाचा निर्णय व्हावा.