आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वसमावेशक विकासाच्या योजना वाड्यांपर्यंत पोहोचवल्या; विविध वस्तुंचे वाटप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पंचायतराज व्यवस्था निर्माण करून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना दिली. त्यामुळे पंचायत समिती हे ग्रामीण विकासाचे केंद्र बनले आहे. याद्वारे सर्वसामान्यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या योजना तालुक्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
पंचायत समिती कर्मचारी निवासस्थानाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व विविध योजनांतर्गत साहित्य वाटप डॉ. तांबे यांच्या हस्ते शनिवारी (21 जून) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, उपसभापती बाळासाहेब गायकवाड, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, काँग्रेसचे तालुकाप्रमुख बाबा ओहोळ, माजी सभापती अविनाश सोनवणे, दूध संघाचे अध्यक्ष रामनाथ राहणे, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते सरूनाथ उंबरकर, गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास समान अधिकार दिले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विकासाच्या योजनांमुळे तळागाळातील सामान्य माणसांचा विकास साधला जातो. मंत्री थोरात यांच्या प्रयत्नांतून तालुक्यात विविध विकास कामे मार्गी लागली जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नामदेव कहांडळ यांनी, तर आभार पंचायत समिती सदस्य रावसाहेब नवले यांनी मानले.
इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर
४साडेदहा कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या पंचायत समिती इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. शहराच्या विकासासाठी पूरक ठरलेला बाह्यवळण मार्ग, विविध खात्यांच्या अद्ययावत इमारती, प्रवरा नदीवरील पूल, भूमिगत गटारी अशी अनेक कामे मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. दंडकारण्य अभियानात सहभाग घेताना महिलांनी बोगनवेल व कन्हेरीच्या फुलझाडांचे रोपन करावे. ’’ दुर्गा तांबे.
छायाचित्र - कृषी, महिला बालकल्याण व समाजकल्याण विभागांतर्गत विविध वस्तुंचे वाटप करताना आमदार डॉ. सुधीर तांबे. समवेत माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे.