आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशाल गणेश मंदिरास शासनाचा देखाव्यासाठी द्वितीय पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने गणेशोत्सव २०१६ पासून जिल्हा तालुकास्तरावरील सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणेश माळीवाडा पंचमंडळ देवस्थानला तालुकास्तरीय गटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. 
 
राज्याचे सांस्कृतिक विभागाच्यावतीने प्रत्येक जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आल्या होत्या. या समित्यांनी गणेशोत्सवाच्या काळात विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन त्या मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेऊन या पुरस्काराचे परीक्षण केले होते. १५ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आदिंचा समवेश आहे. समितीचे समन्वयक प्रशांत नेटके, उपअविक्षक नितीन चारुडे यांच्या हस्ते देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे, मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, गणेश राऊत आदि उपस्थित होते. उपाध्यक्ष खरपुडे म्हणाले, शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणेश मंदिर हे फक्त जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील भाविकाचे दैवत आहे. येथे असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. गणेशोत्सव काळात १० दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये स्त्री भ्रुण हत्या, हुंडाबंदी, वृक्षारोपण, स्वच्छता, लेक वाचवा आदिंबाबत जनजागृती करुन या विषयी नाटिका, पोस्टर्स, विविध स्पर्धा घेण्यात येत असतात. तसेच विसर्जन मिरवणुक वेळेत पार पाडणे, शिस्तबद्ध, पारंपारिक वाद्य, सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक प्रात्यक्षिक केली जातात. त्यामुळे यासाठी अनेक संस्थांच्यावतीने सन्मानही करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने सुरु केलेला उपक्रम स्त्युत्य असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...