आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारची साई संस्थानला ‘कारणे दाखवा’ नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - आपल्या परवानगीशिवाय अनेक प्रकल्पांवर लाखो रुपयांचा अंदाधुंद खर्च केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारने शिर्डीतील साई मंदिराचे व्यवस्थापन करणार्‍या ट्रस्टला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत विचारलेल्या प्रश्नात ही बाब उघड झाली आहे.

श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने शिर्डी शहरात रस्तेनिर्मितीसारख्या मूलभूत सेवा-सुविधांवर खर्च केल्याबद्दल सरकारच्या विधी आणि न्याय विभागाने संस्थानला नोटीस बजावली आहे. माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत आरटीआय कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी मंदिर व्यवस्थापनाकडून विविध योजनांवर झालेल्या खर्चांचा तपशील आणि इतर आर्थिक बाबींचे विवरणही मागवले होते. विधी आणि न्याय विभागाने ट्रस्टकडून स्पष्टीकरण मागवले असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. संस्थानच्या सूत्रांनी सरकारी नोटीस मिळाल्याची पुष्टी केली आहे. शिर्डी संस्थानचे व्यवस्थापन करणार्‍या विश्वस्तांची सरकारकडून नेमणूक करण्यात येते
कुलकर्णी म्हणाले : संस्थानच्या विद्यमान व्यवस्थापन मंडळाने (विश्वस्त) यापूर्वीही सरकारकडून परवानगी न घेता विविध योजनांवर कोट्यवधींचा खर्च केल्याचे निदर्शनास आले होते. संस्थानने सरकारची मंजुरी न घेता आपल्या हजारो कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगानुसार मेहनताना दिला आहे. याशिवाय कर्मचार्‍यांना विनापरवानगी बोनसही वाटण्यात आला आहे. राज्य सरकारच्या नियमांचे हे उल्लंघन आहे.