आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानसाठी गोविंदाचे साईंना साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - हिट अँड रनप्रकरणी जामिनावर सुटलेला अभिनेता सलमान खानसाठी त्याचा मित्र व अभिनेता गोविंदा याने शिर्डीत साईचरणी प्रार्थना केली. या वेळी त्याच्यासोबत पत्नी सुनीताचीही उपस्थिती होती.

गोविंदा म्हणाला, मी सलमानसाठी प्रार्थना करण्यास साईबाबा चरणी आलो आहे. त्यामुळे या वेळी मी काहीही बोलू इच्छित नाही. दोन दिवसांपूर्वीच गोविंदाने सलमानची त्याच्या गॅलेक्सी सोसायटीतील घरी जाऊन भेट घेतली होती. गोविंदा व सलमानने डेव्हिड धवन यांच्या "पार्टनर' या चित्रपटात काम केले होते. आपला मित्र सलमान या प्रकरणातून सहीसलामत सुटावा यासाठी गोविंदाने साई दरबारी साकडे घातले आहे. दरम्यान, पत्रकारांनी सलमानबाबत विचारलेल्या काेणत्याही प्रश्नांना उत्तर देण्यास मात्र त्याने नकार दिला.

पाच वर्षांपासून रखडलेला गाेविंदाचा ‘अभिनय चक्र’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर अाहे. हा चित्रपट यशस्वी व्हावा यासाठीही त्याने साईबाबाला साकडे घातले. साईबाबा संस्थानच्या वतीने गोविंदाचा सत्कार करण्यात आला. ‘मी साईबाबांचा मी निस्सीम भक्त असून त्यांच्या आशिर्वादानेच यशाच्या शिखरावर पोहोचलो आहे,’ अशी भावनाही गाेविंदाने व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...