आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधरची निवडणूक लांबणीवर पडणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असताना न्यायालयाने जुनी मतदारयादी रद्द करून नव्याने मतदार नोंदणी करण्याचे निर्देश दिले. ऑक्टोबरपासून जिल्ह्यात नव्याने सुरू केलेल्या मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ही निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता होती. मात्र, आता ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुदत डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता होती. काँग्रेसबरोबरच भाजपनेही आचारसंहिता लागण्यापूर्वीच या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे पक्षाने या निवडणुकीच्या प्रचारासाठी जोरदार नियोजन केले. भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत तीन बैठका झाल्या अाहेत. काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा असली, तरी अद्याप काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी निश्चित झाल्याने डॉ. तांबे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम आहे.

गेल्या निवडणुकीत हातातून गेलेला हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सन २०१० मध्ये झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीत भाजप-सेना युतीचे उमेदवार प्रा. सुहास फरांदे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. तांबे यांच्यात लढत झाली होती. त्यात डॉ. तांबे विजयी झाले. नाशिक पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यापूर्वी या मतदारसंघातून प्रा. ना. स. फरांदे हे दोन वेळा निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत डॉ. तांबे यांनी पहिल्याच टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरुवात केली. भाजपकडून मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे उमेदवार म्हणून प्रा. सुहास फरांदे यांनी अर्ज दाखल केला होता. गेल्या निवडणुकीत उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात झालेला विलंब त्याचबरोबर अर्ज दाखल करण्यास झालेला विलंब लक्षात घेता भाजपने यावेळी निवडणुकीपूर्वीच डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.

नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील पदवीधर मतदार हे या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नाशिकनंतर सर्वाधिक मतदार नगर जिल्ह्यात होते. नाशिक जिल्ह्यात लाख ३२ हजार, नगर जिल्ह्यात लाख १३ हजार, जळगाव जिल्ह्यात ५५ हजार, धुळे जिल्ह्यात २० हजार नंदुरबार जिल्ह्यात २० हजार असे मतदार होते. मात्र, गेल्या महिन्यात न्यायालयाने पदवीधरची संपूर्ण मतदारयादीच रद्द केल्याने आता नव्याने पुन्हा मतदार नोंदणीला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरपासून जिल्ह्यात पदवीधरच्या मतदार नोंदणीला सुरुवात झाली होती. ते १८ ऑक्टोबरपर्यंत हजार ५९ मतदारांची नोंदणी झाली होती. गेल्या तीन दिवसांत केवळ हजार जणांनी नोंदणी केली. आतापर्यंत हजार मतदार नोंदणी झाली असून, आगामी महिन्याभरात प्रशासनाला मतदार नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. त्यातच दिवाळीची सुटीही आहे. त्यामुळे नोंदणीला काही प्रमाणात ब्रेक मिळणार आहे.

अकोले तालुक्यात सर्वाधिक नोंदणी
आदिवासी भाग असलेल्या अकोले तालुक्यात ते १८ ऑक्टोबरपर्यंत ७१५ मतदारांची नोंदणी झाली. पारनेर तालुक्यात केवळ १०४ मतदार नोंदणी झाली आहे. संगमनेर ५३६, राहाता २७८, कोपरगाव २३०, श्रीरामपूर १४६, नेवासे १२६, नगर ४९८, शेवगाव १६७, पाथर्डी २५६, श्रीगोंदे १४९, कर्जत २८६ जामखेड येथे २३६ मतदार नोंदणी झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...