आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू आहे. पक्षाचे उमेदवार संग्राम कोते यांनी विद्यार्थ्यांसाठी राज्यभर चळवळ उभी केली असून पक्षाची मोठी ताकत असल्याने ते निश्चित विजयी होतील, असा विश्वास माजी आमदार दादा कळमकर यांनी व्यक्त केला.

आगामी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी कळमकर बोलत होते. यावेळी आमदार अरुण जगताप संग्राम जगताप, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, अभिषेक कळमकर, माणिक विधाते, कुमार वाळके, आरिफ शेख, संभाजी पवार, सलिम शेख, प्रकाश भागानगरे, जितू गंभीर, बाबा गाडळकर, दिलदार सिंग, सारंग पंधाडे आदी उपस्थित होते.

कळमकर म्हणाले, राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार आहे. पक्षाचे उमेदवार कोते यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नी आंदोलन करून ते सोडवण्यास शासनाला भाग पाडले. राष्ट्रवादी हा चळवळीत काम करणाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा पक्ष आहे. पाचही जिल्ह्यांत मोठी ताकद असल्याने कोते निवडून येतील.

कोते म्हणाले, मी केलेल्या कामाची पावती म्हणून पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. भाजप हा मार्केटिंग करणारा हुशार पक्ष आहे. त्यामुळे आपणही सर्व युवकांनी जागृत राहिली पाहिजे. या बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...