आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक भांडार प्रकरण: संचालकांसह उपनिबंधकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ग्राहक भांडारचे संचालक, तत्कालिन व्यवस्थापक, प्रशासक व जिल्हा उपनिबंधकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली वाघमोडे यांनी गुरूवारी तोफखाना पोलिसांना दिले. संस्थेचे सभासद संजय ढापसे यांनी दाखल केलेल्या खासगी फिर्यादीवर न्यायालयाने हा आदेश दिला.

ग्राहक भांडारच्या संचालक मंडळाने सेवानिवृत्तीचे वय झालेल्या व्यवस्थापक प्रकाश गांधी यांना जाणीवपूर्वक कार्यरत ठेवले. तक्रारीनंतर त्यांच्या जागी सुरेंद्र भंडारी यांची नियुक्ती केली. स्वत:च्या फायद्यासाठी संस्थेच्या जिल्हा बँक व र्मचंटस् बँकेतील खात्यातून वेळोवेळी 9 लाख 47 हजार रुपये काढले. यासंदर्भात तक्रार करूनही प्रशासक व जिल्हा उपनिबंधकांनी संबंधितांवर कारवाई केली नाही. सभासदांची फसवणूक झाल्याने संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल होणार..
शरद रच्चा, शरद क्यादर, विजयसिंह परदेशी, हिरालाल भंडारी, प्रदीप बोरा, राजकुमार गांधी, दादा कळमकर, वैभव लांडगे, अतुल भंडारी, अरविंद गुंदेचा, छाया फिरोदिया, आशा फिरोदिया, सुनंदा भालेराव, सुनिता सारसर, प्रकाश गांधी, सुरेंद्र भंडारी, किरण आव्हाड व दिगंबर औताडे.