आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Grampanchayat Bycotte On Users Of Information Officer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहितीचा अधिकार वापरला म्हणून ग्रामपंचायतीने टाकला बहिष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - माहितीच्या अधिकारात शासकीय योजनांची माहिती मागितल्याचा राग धरून ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी सामाजिक कार्यकर्त्यावर दोन वर्षांपासून बहिष्कार टाकला आहे. स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत तसा ठराव करण्यात आला. हा प्रकार सावरगाव पाट (ता. अकोले) येथे घडला. हा ठराव करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी ‘अंनिस’च्या जिल्हा कार्याध्यक्ष रंजना गवांदे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.

सुदाम राधाकृष्ण सहाणे यांनी माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायतीकडे विविध योजनांची माहिती मागितली होती. त्याचा राग मनात धरून 15 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या ग्रामसभेत सहाणे यांच्यावर खोट्या तक्रारी केल्याचा, तसेच सार्वजनिक कामांना खीळ घालत असल्याचा ठपका ठेवत संपूर्ण गावाने बहिष्कार टाकण्याचा ठराव केला गेला. अशा पद्धतीने बहिष्कार टाकणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर अन्याय असल्याची टीका गवांदे यांनी केली आहे. असा ठराव संमत करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.