आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर: 195 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, सरपंचपदासाठी 637 उमेदवार रिंगणात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित १९५ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी (७ ऑक्टोबर) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रथमच सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्यामुळे या पदासाठी ६३७ उमेदवार, तर सदस्यपदासाठी 3 हजार ५५० उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २२७ मतदान केंद्र संवेदनशील, तर ११ मतदान केंद्र अतिसंवेदशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. 
 
नगर जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू आहे. सरपंचपदाची निवड प्रथमच जनतेतून होणार असल्यामुळे सरपंचपदासाठी तब्बल हजार ३८० जणांनी अर्ज दाखल केले होते, तर सदस्यपदासाठी हजार ३८० जणांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत सरपंचपदासाठीचे २२ अर्ज अवैध, तर सदस्यपदासाठी १५३ अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. उर्वरित उमेदवार रिंगणात उरले होते. त्यातही २०५ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १९५ ग्रामपंचायतीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 

ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला होता. ज्या गावांत निवडणूक होत्या, ती गावे प्रचारांत दंग झाली होती. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेंडी, भंडारदरा या प्रमुख ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. या तालुक्यात माजी मंत्री मधुकर पिचड आमदार वैभव पिचड यांचे वर्चस्व आहे. संगमनेर तालुक्यातील प्रामुख्याने घुलेवाडी, जाेर्वे, तळेगाव दिघे, पिंपरणे, अंभोरे, कोल्हेवाडी, निमोण या प्रमुख ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आमदार बाळासाहेब थोरात यांचे गाव असलेल्या जोर्वे ग्रामपंचायतीचीही निवडणूक होत असल्यामुळे या निवडणुकीसाठी थोरात यांचा गट सक्रिय आहे. कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख, रांजणगाव देशमुख, चासनळी, बहादरपूर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. 

काळे-कोल्हे गट या तालुक्यात सक्रिय आहे. श्रीगोंदे तालुक्यातील घोगरगाव, काष्टी, बेलवंडी या मोठ्या ग्रामपंचायती आहेत. आमदार राहुल जगताप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गटाने या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, कोरडगाव, निवडुंगे, मोहरी, भालगाव, सोनोशी या ग्रामपंचायतीसाठी माजी आमदार राजीव राजळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या गटाने मोर्चेबांधणी केली आहे. राहाता तालुक्यातील साकुरी, डोऱ्हाळे या प्रमुख ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या गटासह माजी नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा यांचे गट आमन-सामने आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी, उंबरगाव, कमलापूर, वांगी खुर्द, ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अन्य नेतेही सक्रिय आहेत. राहुरी तालुक्यातील कोंढवड, सोनगाव, ताहाराबाद, कोल्हार खुर्द, नेवासे तालुक्यातील वडाळा बहिरोबा, भेंडा खुर्द, माका, शेवगाव तालुक्यातील आखेगाव, अमरापूर, वाघोली, दहिगावने, कर्जत तालुक्यातील कोपर्डी, आळसुंदे, पारनेर तालुक्यातील ढवळपुरी, वनकुटे, गुणोरे, पळशी, भाळवणी, गोरेगाव या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. शनिवारी जिल्ह्यातील ७७८ मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मतदानासाठी हजार ९८० कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी हजार ३६८ मतदान यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. शुक्रवारी मतदान यंत्रासह कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. 
 
नगरतालुक्यांकडे अनेकांचे लक्ष 
नगरतालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे. सरपंचपदासाठी दिग्गज रिंगणात आहेत. नगर तालुक्यातील नारायणडोह, जखणगाव, कौडगाव जांब, साकत, नांदगाव, नेप्ती, पिंपळगाव लांडगा, राळेगण, सारोळा बध्दी, आगडगाव, बाबुर्डी बेंद, कापूरवाडी, नागरदेवळे, सारोळा कासार, शेंडी, वाळकी या ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

जिल्ह्यातील अकरा मतदान केंद्रे अतिसंवेदनशील 
मतदानाच्या २४ तास अगोदर प्रशासनाने जिल्ह्यातील संवेदनशील अतिसंवेदनशील मतदान केंद्रे जाहीर केली आहेत. जिल्ह्यात ११ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक कर्जत तालुक्यातील केंद्रांचा समावेश आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये संगमनेर २०, कोपरगाव १६, राहुरी २३, राहाता २०, पारनेर ४१, पाथर्डी २२, श्रीगोंदे २३, कर्जत १२ अशा मतदान केंद्रांचा समावेश आहे. अतिसंवेदनशील संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...