आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथराज भागवत शोभायात्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सावेडी उपनगरातील भागवत ज्ञानयज्ञ सोहळा नियोजन समितीच्या वतीने श्रीमद् भागवत ग्रंथ पालखीची शोभायात्रा मोठ्या उत्साहाने काढण्यात आली. छाया: अर्जुन कुलकर्णी)
नगर - सावेडीतील भागवत ज्ञानयज्ञ सोहळा नियोजन समितीच्या वतीने श्रीमद्भभागवत ग्रंथ पालखीची शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. भगव्या पताका घेतलेले वारकरी महिला मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले.

ओंकार कॉलनीतील दुर्गामाता मंदिरासमोरून शोभायात्रेला प्रारंभ झाला. फुलांच्या माळांनी सजवलेल्या पालखीत श्रीकृष्णाची मूर्ती भागवत ग्रंथ ठेवण्यात आला होता. भागवताचार्य शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी दीक्षाधिकारी ओझे महाराज (पनवेल) डॉ. देविदास जोशी (पुणे) उपस्थित होते. नियोजन समितीचे प्रमुख डॉ. आनंद नांदेडकर सुहास कांडीवकर यांनी खांद्यावर पालखी घेऊन शोभायात्रेस सुरूवात केली.
सुहासिनी, बँडपथक, टाळ-मृदंग पथक यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सनई-चौघड्यांच्या निनादात, नामघोष करत निघालेली शोभायात्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...