आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटवर्धन स्मारकात 9 पासून ‘ग्रंथोत्सव’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या 9 ते 11 मार्चदरम्यान ‘ग्रंथोत्सव - 2013’ आयोजित करण्यात आला आहे.

‘ग्रंथोत्सव - 2013’ अंतर्गत सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन येत्या 9ला सकाळी 11 वाजता ज्येष्ठ लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विलास गिते, माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल उपस्थित असतील.

पहिल्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता कविसंमेलन होईल. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. चं. वि. जोशी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री शर्मिला गोसावी करतील.

10 मार्चला सायंकाळी 5 वाजता ‘वाचन संस्कृतीचे भवितव्य’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक प्रा. हेमंत गोखले असतील. साहित्यिक कैलास दौंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या परिसंवादात प्रा. मेधा काळे, प्रा. डॉ. सुधाकर कुर्‍हाडे, डॉ. संजय कळमकर, डॉ. क्रांती अनभुले, चंद्रकांत पालवे, प्रा. डॉ. चं. वि. जोशी, शिरीष मोडक सहभागी होतील. सूत्रसंचालन प्रा. मकरंद खेर करतील. ग्रंथोत्सवाचा समारोप 11 मार्चला सायंकाळी 5 वाजता ‘वाचन - एक सहप्रवास’ या कार्यक्रमाने होईल.

अवघ्या 300 रूपयांत पुस्तकांचे स्टॉल
ग्रंथप्रदर्शनात विज्ञान, समाजकारण, राजकारण, विनोद, कृषी, बालसाहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील. पुस्तकविक्रीसाठी केवळ 300 रूपयांत स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रकाशक व विक्रेत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथप्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत खुले असेल. शाळेतील मुलांनी प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन संयोजक प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी केले आहे.