आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gratitude Awards Diclared To Kakodakar And Other's

डॉ. काकोडकर, आमटे, पुरंदरेंना कृतज्ञता पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नेवासे तालुक्यातील सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे यंदाचे कृतज्ञता पुरस्कार नामवंत शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, समाजसेवक डॉ. मंदाकिनी व प्रकाश आमटे दांपत्य व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार 24 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता सोनईत मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात प्रदान केले जातील, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी दिली.

माजी खासदार यशवंतराव गडाख या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. प्रत्येकी एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. अनिल काकोडकर यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. थेरियमचा अणुऊर्जा निर्मितीसाठी केलेल्या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे.

कुष्टरोगी व आदिवासी समाजासाठी जीवन समर्पित करणारे महामानव बाबा आमटे यांच्या पावलावर पाऊल टाकून आदिवासी समाजासाठी समाजकार्य करणाºया व प्राणीमित्र व नि:स्वार्थी समाजसेवक असलेल्या डॉ. मंदाकिनी व प्रकाश आमटे दांपत्य यांनाही यंदाचा कृतज्ञता पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा सखोल अभ्यास करून जनतेला प्रवचन व व्याख्यान देणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

या पुरस्कारार्थी व्यक्तींचे विचार ऐकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आमदार शंकरराव गडाख व अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केले आहे. मागील काही वर्षांपासून सोनईत आयोजित साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांना गावकºयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पुरस्काराचे दुसरे वर्ष
४समाजसेवक, शास्त्रज्ञ, लेखक, कलावंत आदींच्या योगदानातून समाज प्रगतिपथावर जातो. समाजातील त्यांच्या ऋणांना कृतज्ञतेचा नमस्कार करावा, या उद्देशाने यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञता पुरस्कार दिला जात आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी पद्मभूषण कवी व दिग्दर्शक गुलजार, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व ज्येष्ठ समाजिक कार्यकर्त्या डॉ. नसीमा हुरजूक यांना गौरवण्यात आले होते.’’
प्रशांत गडाख, अध्यक्ष, यशवंत प्रतिष्ठान.