आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये प्रथमच साकारली 'ग्रीन जिम'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीन जिममध्ये मुलांसोबत व्यायाम करताना महिला.
नगर - शहरातील वाहनांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी पुढाकार घेतला आहे. केडगावातील शाहूनगरमधील महापालिकेच्या उद्यानात त्यांनी खुली 'ग्रीन जिम' सुरू केली. येत्या दोन दिवसांत या जिमचे लोकार्पण होणार आहे. या ‘ग्रीन जिम’च्या माध्यमातून नागरिकांना व्यायामाची सवय लागणार आहे. नागरिकांनी या अभिनव उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

धकाधकीच्या जीवनात अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिक युवकांना व्यायामाचे महत्त्व पटावे, त्यांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, व्यायामासाठीचे साहित्य त्यांना सहज उपलब्ध व्हावे, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उपमहापौर कोतकर यांनी खुल्या 'ग्रीन जिम'ची संकल्पना मांडली. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी कोतकर यांनी सहा लाख रुपयांचा निधी उभा केला. त्यातून केडगाव उपनगरातील शाहूनगर येथील महापालिकेच्या उद्यानात खुली 'ग्रीन जिम' सुरू करण्यात आली. व्यायामाचे सर्व साहित्य उद्यानात बसवून ते नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. या खुल्या 'ग्रीन जिम'चा लोकार्पण सोहळा दोन दिवसांत होणार आहे. त्यानंतर केडगावसह शहरातील नागरिकांनाही निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम करता येणार आहे.
पक्षांचा चिवचिवाट, आजूबाजूला दुर्मिळ जातीचे वृक्ष, वेगवेळ्या प्रकारची फुले अशा प्रसन्न वातावरणात नागरिकांना व्यायामाचा आनंद घेता येणार आहे. विशेष करून महिलांना या जिमचा मोठा लाभ होणार आहे. शाहूनगरसह आजूबाजूच्या परिसरातील महिला या जिममध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. नगर शहर विकासापासून दूर असले, तरी शहराचा विकासाचे स्वप्न हाकेच्या अंतरावर असल्याचे उपमहापौर कोतकर यांनी खुल्या 'ग्रीन जिम'च्या माध्यमातून दाखवून दिले आहे. मुंबई- पुणे शहराची मक्तेदारी असलेली खुली 'ग्रीन जिम' ही संकल्पना नगर शहरात प्रत्यक्षात साकारली जात आहे. केडगावसह नगर शहराच्या विविध भागात खुल्या "ग्रीन जिम'ची संकल्पना येत्या काही दिवसांत दृढ होणार आहे. त्याचे श्रेय उपमहापौर कोतकर यांनाच जाणार आहे. कोतकर यांनी पुढाकार घेतल्याने केडगावसह शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवकांचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल.

नगरकरांना दीर्घायुष्य
केडगाव सारख्या उपनगरात खुली 'ग्रीन जिम' सुरू झाली, ही आमच्यासाठी मोठी बाब आहे. मुंबई- पुणे शहरासारख्या सुविधा आता नगर शहरात उपलब्ध होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. शहरातील विविध भागात अशा जिम उभ्या राहिल्या, तर नगरकरांना नक्कीच दीर्घायुष्य लाभेल.अमित शिंदे, नागरिक,शाहूनगर

उपमहापौरांचा पुढाकार
केडगावकरांनाविकासकामांची अपेक्षा होतीच. माजी महापौर संदीप कोतकर उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. केडगाव पाणी योजना, अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाइन, गटार, लहान- मोठी उद्याने, तसेच सर्वांसाठी मोफत खुली 'ग्रीन जिम' ही संकल्पना हे त्याचेच प्रतीक आहे.

लोकसहभागातून खुलले उद्यान
माजीमहापौर संदीप कोतकर यांनी शाहूनगरमध्ये उद्यान विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले. मनपाच्या मोकळ्या भूखंडावर उद्यान विकसित करावे, अशी शाहूनगरमधील नागरिकांची मागणी होती. कोतकर यांनी या मागणीचा विचार करून शाहूनगरमध्ये उद्यान उभारले. परिसरातील अनेक नागरिकांनी स्व:खर्चातून या उद्यानात दुर्मिळ वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना केली. आज या उद्यानात दुर्मिळ वृक्ष वाढीला लागले आहेत. त्यात कोतकर यांनी या उद्यानात खुली 'ग्रीन जिम' सुरू करून जागरूक नागरिकांच्या प्रयत्नांना मोठे बळ दिले आहे.

दिवसाची सुरुवात चांगली व्हावी, दिवसभर धावपळ कामाचा व्याप आला तरी त्याला तोंड देता यावे, यासाठी केडगावातील शाहूनगरमधील महापालिकेच्या उद्यानात ग्रीन जिम सुरू करण्यात आली आहे. या जिमला केडगावकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...