आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Groundwater Survey And Scientific Development Agency News In Marathi

जिल्ह्यात अर्ध्या मीटरने खालावली पाणी पातळी, भूजल यंत्रणेचा अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- टंचाई निवारणार्थ उपाय योजना करताना वरिष्ठ भुवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून सादर होणारा पाणी पातळीचा अहवाल महत्त्वपूर्ण आहे. त्यानुसार जानेवारीअखेर मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी अर्धा मीटरने खालावली आहे. एप्रिलपर्यंत ही पातळी आणखी खालावण्याची चिन्हे अाहेत. जिल्हाभरातील १२ तालुक्यांना दुष्काळाच्या झळा जाणवणार आहेत.
पाण्याचा बेसुमार उपसा होत असल्याने भूजल पातळीत कमालीची घट होताना दिसून येत आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत वर्षभरात चार वेळा पाणी पातळीचे सर्वेक्षण करून संशोधन केले जाते. ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे या चार महिन्यात हे सर्वेक्षण केले जाते. हे सर्वेक्षण करताना त्या महिन्यातील पाणी पातळीची मागील पाचवर्षांतील सरासरी पाणी पातळीशी तुलना करून पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी वाढली किंवा घसरली याचा अंदाज बांधला जातो. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाल्यानंतर टंचाई निवारणार्थ उपाय योजनांचे नियोजन आखले जाते. जानेवारी २०१५ देखील या कार्यालयामार्फत भूजल सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यातील २०२ विहिरींची तपासणी करण्यात आली. तपासणीत आढळून आलेल्या पाणी पातळीची मागील ५ वर्षातील पाणी पातळीशी तुलना केली आहे. त्यानुसार १२ तालुक्यातील पाणी पातळी खालावल्याचे सिद्ध झाले. त्यात पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, पारनेर, नगर, नेवासे, जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, संगमनेर, कोपरगाव या तालुक्यांचा त्यात समावेस आहे. ठिबक व तुषार सिंचनाऐवजी चारीद्वारे पिकांना पाणी देण्याचे प्रमाण अधिक असल्याने भूगर्भातील पाण्याचा अमर्याद उपसा सुरू आहे. पावसाच्या पाण्यावर खरिपाची निघतात पण रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याचा उपसा सुरू होतो. परंतु, यावर्षी अवकाळी पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणी उपसा कमी प्रमाणात झाल्याने पाणी पातळीतील घट अवघी अर्धा मीटर झाली. अवकाळी पावसाने दिलासा दिला नसता तर दुपटीने फरक पडण्याची शक्यता होती. सद्यस्थिती पाहता रब्बी हंगाम धोक्यात आल्याचे िचत्र सध्या िजल्ह्यात िदसून येत आहे.

यामुळे घटली पातळी
जिल्ह्यात शेततळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भुगर्भातील पाण्याचा अमर्याद उपसा होऊन सिंचनाच्या पुढील नियोजनासाठी या तलावात साठवले जाते. त्यातच तलावात प्लास्टिकच्या कागदाचे अच्छादन असल्याने ही पाणी झीरपत नाही. त्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट होत असल्याचे दिसून येत असल्याचे जलतज्ज्ञांचे मत आहे.

असे केले सर्वेक्षण
भूजल पाणी पातळीचे सर्वेक्षणासाठी २०२ विहिरी निवडल्या. विहिरी निवडताना रनर झोन, रिचार्ज झोन व स्टोरेज झोन विचारात घेतला आहे. डोंगर उतारावरील रनर झोनच्या ठिकाणी पाणी वेगाने वाहते, रिचार्ज झोनमध्ये पाणी झिरपते व वाहते, तर स्टोरेज झोनमध्ये पाणी संथ गतीने वाहते व खडकातील रचनेमुळे साठा वाढतो. या तीनही झोनमधील विहिरींच्या सर्वेक्षणातून अहवाल तयार केला.

अचूक अंदाजाला मर्यादा
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जेथे पर्जन्यमापक आहे, तेथेच मोजले जाते. विशम पाऊस व भूगर्भातील खडकांची रचना त्यामुळे भूजल पातळीचे प्रमाण कमी-अधिक आहे. जिल्ह्यातील गावांची संख्या दीड हजारांवर असताना २०२ विहिरींच्या नमुण्यांची तपासणी करून अंदाज बाधंण्यात आला आहे. टंचाई निवारणार्थ उपाय योजनांसाठी हा सर्वे महत्त्वाचा मानला जातो.