आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्‍ट्रवादीने प्रवाशांना साखर वाटून केला भाडेवाढीचा निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रेल्वेस्थानकावरील महिलांना हळदी-कुंकू लावून तसेच प्रवाशांना साखर वाटप करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे भाडेवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. शनिवारी (21 जून) दुपारी हे आंदोलन झाले.यापूर्वी काँग्रेस राजवटीत कोणत्याही जीवनावश्यक वस्तू किंवा रेल्वे तिकिटाची भाडेवाढ झाली तर शिवसेना-भाजपकडून निदर्शने केली जात होती. आता युती सत्तेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी बाकांवर बसले आहेत. काँग्रेसच्या काळात झालेल्या रेल्वे भाडेवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी मोदी सरकारने केली. त्यावर औरंगाबादेतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नाही.
मात्र, राष्ट्रवादीच्या महिलांनी लोकभावना जाणून घेत आंदोलन केले. त्यांनी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास रेल्वेस्थानकावरील महिलांना हळदी-कुंकू लावले. प्रवाशांना साखर वाटप केली. मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ घोषणेचा निषेधही केला. या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस कीर्ती उढाण, सीमा थोरात, यशस्वी वाघमारे, सुभद्रा जाधव, स्नेहा बनसोडे, मंजूषा पवार, उषा फल्ले, सुवर्णा सोमवंशी, मीनाक्षी पवार, वैशाली गुंड, प्रतिभा वैद्य यांचा सहभाग होता.