आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जीआयएस' ठरणार स्मार्ट नगरसाठी वरदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी जीआयएस प्रणाली वरदान ठरणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मालमत्ता, ओढे-नाले, रस्ते, जलवाहिन्या, मोकळे भूखंड, विजेचे खांब, ड्रेनेजलाइन ही माहिती संकलित करण्याचे काम प्रगतिपथावर अाहे. या सर्व माहितीचे डिजिटायझेशन स्कॅनिंगचे ५० टक्के काम पूर्ण झाले अाहे. शहराच्या नियोजित विकासासाठी जीआयएसचा उपयोग होणार आहे. शिवाय महापालिकेच्या वार्षिक उत्पन्नातही त्यामुळे कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे.

जीआयएसच्या माध्यमातून प्रत्येक इमारतीची इत्थंभूत माहिती जमा करून तिचे स्कॅनिंग डिजिटायझेशन करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५० हजार मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. मालमत्तांसह ओढे-नाले, रस्ते, जलवाहिन्या, विजेचे खांब, तसेच मोकळ्या भूखंडांची सर्व माहिती संकलित करण्यात येत आहे. या माहितीचे डिजिटायझेशन स्कॅनिंग करण्यात येत आहे. भविष्यातील शहर विकास आराखडा मालमत्ता कर वसुलीसाठी या भौगोलिक माहितीचा उपयोग होणार आहे. कोलकता येथील स्टेटलाईट संस्थेला कोटी ५६ लाख रुपयांना हे काम देण्यात आले आहे. संस्थेने आतापर्यंत सावेडी, केडगाव, नागापूर, बोल्हेगाव, तसेच मध्यवर्ती शहराच्या काही भागातील ५० हजार इमारतींची माहिती संकलित केली आहे. इमारतीचे मोजमाप, मालकाचे नाव, घरगुती व्यावसायिक वापर, नळजोड, आजुबाजूची ओळखीची ठिकाणे अशी सर्व माहिती संकलित करून तिचे स्कॅनिंग डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. प्रत्येक इमारतीची फूटप्रिंट नकाशावर घेण्यात येणार आहे.

मागील पाच वर्षांत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. मात्र, मनपाकडे केवळ ९८ हजार इमारतींचीच नोंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा कर बुडत होता. आता जीआएस सर्व्हेमुळे शहरातील नव्या जुन्या अशा सर्वच इमारतींची नोंद मनपाकडे होणार आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार जीअाएस सर्व्हेमुळे २५ ते ३० हजार इमारतींची नव्याने नोंद होणार आहे.
आयुक्तांचा पाठपुरावा
आयुक्त विलास ढगे हे जीआयएस सर्व्हेमध्ये येणाऱ्या अडचणींकडे लक्ष ठेवून आहेत. मनपा अधिकारी, कर्मचारी, तसेच संबंधित ठेकेदार संस्थेच्या प्रतिनिधींची ते वेळोवेळी बैठक घेतात. कामात येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर करत सर्व्हे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न अाहे.

काय आहे जीआयएस ?
जीआयएसहे एक सॉफ्टवेअर असून त्यात शहरातील सर्व भौगोलिक माहिती अपडेट करण्यात येणार आहे. प्रत्येक इमारतीची फूटप्रिंट जीआयएसच्या नकाशावर पाहता येणार आहे. मालमत्ता वसुली असो की, शहर विकास आराखडा, पाण्याची पाइपलाइन असो की रस्ते, प्रत्येक माहिती या प्रणालीद्वारे मनपा प्रशासनाकडे उपलब्ध असेल.

५० टक्के काम पूर्ण
जीआयएस सर्व्हेचे५० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सात ते आठ महिन्यांत पूर्ण होईल. सर्व्हेमुळे मनपाच्या वार्षिक उत्पन्नात २० ते २५ टक्के वाढ होईल. स्मार्ट नगरसाठी जीआयएसची मदत होणार आहे. शहरातील प्रत्येक इमारत अन्य माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. ए. डी. साळी, सिस्टीममॅनेजर, मनपा.