आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री राम शिंदे यांनी साधला शिवारामध्ये शेतकऱ्यांशी संवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संवाद यात्रेत पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतात असा नांगर हातात धरला. - Divya Marathi
संवाद यात्रेत पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतात असा नांगर हातात धरला.
अकोले: पालकमंत्री तथा जलसंधारण, राजशिष्टाचार, इतर मागासवर्गीय भटक्या जाती जमाती विशेष मागसाप्रवर्ग मंत्री प्रा. राम शिंदे हे शेतकरी संवाद सभा उपक्रमाअंतर्गत अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर मवेशी या आदिवासी गावी आले. ग्रामस्थांनी मध्यरात्री ११ वाजले तरीही उत्साहाने लेझीम झांजपथक ताशा, संबळ वाद्य वाजवत जल्लोषात स्वागत केले. 
 
पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे भाजपने आयोजित केलेल्या शिवार संवाद सभा पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजनेच्या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्यातील मवेशी दौऱ्यावर आले होते. मवेशी येथिल बारववाडीत मारुती धोंडू जाधव यांच्या वस्तीवर त्यांनी मुक्काम केला. त्यानिमित्त त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जाधव यांनी पाहुणचारासाठी मस्त पुरणपोळीचा बेत आखला होता. या जेवणाचा आस्वाद पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी येथील शेतकरी तुकाराम जाधव यांच्या शेतात नांगरटीचे काम चालू होते. या प्रसंगी त्यांना लाकडी नांगर हाकण्याचा मोह आवरता आला नाही. कसलेल्या शेतकऱ्याप्रमाणे त्यांनी नांगर धरला. दोन तास घालून नांगरटीचे काम करून काळ्या आईची सेवाही केली. प्रवासात एका वृद्ध महिलेची चौकशी केली. ती निराधार असल्याचे समजल्यानंतर निराधार योजनेचा लाभ देण्याचे तहसीलदारांना आदेश दिले.