आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - कवी गुलजार, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व सामाजिक कार्यकर्त्या नसिमा हुरजूक यांना ‘यशवंत सामाजिक प्रतिष्ठान’तर्फे पहिलाच ‘कृतज्ञता पुरस्कार’ देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी ही माहिती दिली. कला व साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी कवी गुलजार, विज्ञान व संशोधनासाठी डॉ. माशेलकर व अपंगांच्या समाजसेवेसाठी नसिमा हुरजूक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख 1 लाख रुपये असे त्याचे स्वरूप आहे. शनिवारी (26 जानेवारी) दुपारी 3 वाजता सोनईमध्ये मुळा एज्युकेशन सोसायटीतील ‘आमराई’त हा सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार यशवंतराव गडाख आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.