आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलजारांचे \'देवडी\' माऊलींचरणी अर्पण ; नेमाडेंना जनस्थान पुरस्कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासा - प्रसिद्ध गीतकार आणि कवी गुलजार यांचे पहिले मराठी पुस्तक 'देवडी' याचे प्रकाशन संत ज्ञानेश्वरांच्या मंदीरात करण्यात आले.

मराठीतील श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे अभंग कायम माझ्या औत्सूक्याचा विषय राहिले आहेत. यांच्याबद्दलची ओढच मला इथे घेऊन आली, अशी प्रतिक्रीया गुलजार यांनी व्यक्त केली आहे. मराठीतील या महान संताच्या चरणी पुस्तक अर्पण केल्याने आत्मीकशांती लाभली असल्याचे ते म्हणाले.

गुलजार यांनी हिंदी आणि उर्दू मध्ये विपूल लेखन केलेले आहे. त्यासोबतच त्यांची मराठीची ओढही लपून राहिलेली नाही. मराठीतील श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या अनेक कवितांचे त्यांनी उर्दूत भाषांतर केले आहे. कवी सौमित्र सोबत त्यांनी या कवितावाचनाचेही कार्यक्रम महाराष्ट्रात केले आहेत.