आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत तुकाराम वनग्राम योजनेत गुंडेगाव प्रथम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-राज्य सरकारतर्फे दिला जाणारा राज्यस्तरावरील संत तुकाराम वनग्राम योजनेचा प्रथम क्रमांकाचा पाच लाखांचा पुरस्कार नगर तालुक्यातील गुंडेगावला जाहीर झाला. २९ जूनला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार अाहे.
या गावात ८५० हेक्टर वनक्षेत्रावर ग्रामस्थांच्या सहकार्याने, तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वनक्षेत्राचा विकास करण्यात आला. अडीच लाख रोपांची लागवड करण्यात आली आहे. झाडांच्या वाढीसाठी ग्रामस्थांनी विशेष काळजी घेतली.
वनविभागाच्या जमिनीवर डोंगर उतारावर अडीचशे हेक्टर सलग समतल चर खोदल्याने अवकाळी पावसातच हे चर पाण्याने तुडुंब भरले. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी स्थिती असलेले गुंडेगाव एकाच पावसात टँकरमुक्त झाले. गावात झालेल्या दोनशे मिलिमीटर पावसाचा पाणीसाठा आजही टिकून आहे. गावात तीन वर्षांपासून चराईबंदी, कुऱ्हाडबंदी करण्यात आली आहे. गाव वनग्राम करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, सरपंच संजय कोतकर, समाजसेवक राजाराम भापकर, वन परिक्षेत्र अधिकारी आर. जी. देवखिळे, वनपाल आर. एस. कांबळे, सुनील पवार आदींनी प्रयत्न केले. गुंडेगाव हे देवखिळे यांच्या कार्यक्षेत्रातील दुसरे गाव आहे. याआधी हिवरेबाजारने प्रथम क्रमांक मिळवला होता.
बातम्या आणखी आहेत...