आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदुकीचा धाकाने सव्वा सात लाखांची लूट; कऱ्हे शिवारातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- बंदुकीचाधाक दाखवत सव्वा सात लाखाची लूट करण्याची घटना तालुक्यातील कऱ्हे शिवारामध्ये मंगळवारी दुपारी घडली. रात्री उशिरापर्यत यासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान घटनास्थळी नव्यानेच आलेले अपर पोलिस अधीक्षक रोहीदास पवार, उपअधीक्षक अजय देवरे यांनी भेट देत तपासाला वेग दिला. नाशिक-पुणे महामार्गालगतच्या रस्त्यावर लुट करुन गुन्हेगारांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले. 
 
तालुक्यातील पिंपळे शिवारात असलेल्या पिंपळेश्वर पेट्रोल पंपाची रविवार आणि सोमवारची रोकड घेऊन दुपारी दोघे तरुण मोटारसायकलवरुन संगमनेरला बँकेत भरणा करण्यासाठी येत होते. नाशिक-पुणे मार्गालगत असलेल्या निमोणवरुन कर्हेमार्गे हे दोघे तरुण येत असतांना त्याचवेळी दोन पल्सर मोटार सायकलवरुन आलेल्या चौघांनी त्यांना रस्त्यात अडवत बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवलेली लाख २१ हजारांची रोकड आणि त्यांच्याकडील मोबाईल फोन घेऊन संगमनेरच्या दिशने फरार झाले. दरम्यान, पैशाची लुू झाल्याची लक्षात येताच या दोघा तरुणांनी आरडाआेरड करण्याचा प्रयत्न केला.
 
घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक गोविंद आैताडे, संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोविंद आेमासे पोलिस पथकासह तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. पोलिसांनी आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यत चालविला होता. दरम्यान श्रीरामपुरला नव्यानेच आलेले अपर पोलिस अधीक्षक रोहीदास पवार यांना घटनेची मिळताच तेदेखील संगमनेरमध्ये आले. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री उशिरापर्यत तालुका पोलिस ठाण्यात थांबत तपासाबाबत पोलिस पथकांना सूचना केल्या. जिल्ह्यात आरोपींच्या शोधासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. नगरमध्ये नव्यानेच आलेले पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आणि अपर अधीक्षक रोहिदास पवार यांना संगमनेरातील या गुन्ह्याने सलामी दिली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...