आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gurdian Ministers Marketing Food Security In State, Congress Stratagy For Election

राज्यातील पालकमंत्री करणार अन्नसुरक्षेचे ‘मार्केटिंग’,निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्र सरकारने राज्यात अन्नसुरक्षा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या मार्केटिंगची धुरा प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 26 जानेवारी रोजी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री अन्नसुरक्षा योजनेची अधिकृत घोषणा करणार आहेत. दरम्यान, 1 जानेवारीपासून सुरू होणारी ही योजना आता 31 मार्चपासून सुरू होणार आहे. राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश व छत्तीसगड या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यामुळे आत्मपरीक्षणात गुंतलेल्या काँग्रेसने आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच अन्न सुरक्षा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
26 जानेवारीला घोषणा
नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: वेळ काढून या योजनेचा आढावा घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्याला 26 जानेवारीच्या मुहूर्तावर अन्नसुरक्षा योजनेची घोषणा करण्याची सूचना दिली. तसे पत्र मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू होणार्‍या योजनेचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.