आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'साहित्यनगरी'चे पालकमंत्र्यांकडून कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महावीर कलादालनात आयोजित पुस्तक प्रदर्शनाची पाहणी करताना पालकमंत्री राम शिंदे. समवेत खासदार दिलीप गांधी, शेख जाकीर हुसेन, नवनाथ भाबड, शवरद भाबड, प्रा. बी. जी. ससे, आबासाहेब मोरे आदी.)
नगर - महावीरकला दालन येथे पुणे येथील साहित्य नगरीतर्फे आयोजित पुस्तक प्रदर्शनास पालकमंत्री राम शिंदे यांनी नुकतीच भेट दिली. या प्रदर्शनात उपलब्ध असलेल्या विध पुस्तकांबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

खासदार दिलीप गांधी, नगर पर्यटन सांस्कृतिक महोत्सवाचे प्रमुख शेख जाकीर हुसेन, वृक्षमित्र आबासाहेब मोरे, साहित्य नगरीचे संचालक नवनाथ भाबड, शवरद भाबड, प्रा. बी. जी. ससे, उमाजी बिसे, अनिल पडगडमल, सुनील उमाप, विशाल बेलपवार, राजू पटेल, शाजी सुंबे, सुवर्णा पाचपुते, मेजर व्ही. आर. जाधव, आशा कांबळे, शिल्पा दुसंगे, अशोक कोरडे, पोपट पाडळे, नलिनी गायकवाड, अफजल सय्यद, संजय लोळगे, सुनील भांबळ आदी उपस्थित होते.
प्रदर्शनात प्रसिद्ध लेखकांच्या कादंब, कथा, कविता संग्रह, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, विध राजकीय नेत्यांचे चरित्रग्रंथ, ललित, आरोग्य, पाककला, बाल साहित्य, शब्दकोष, ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय, पर्यटन, विज्ञान, सांस्कृतिक, कायदेविषयक, भविष्य, स्पर्धा परीक्षा, दलित आदी पुस्तके मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. पुस्तक खरेदीसाठी साहित्यप्रेमींची गर्दी होत आहे. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी नगरकरांनी साहित्यनगरीस भेट देऊन पुस्तकांची खरेदी केली. पुस्तक प्रेमींसाठी खरेदीमध्ये सवलत आहे, अशी माहिती साहित्यनगरीचे संचालक भाबड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...