आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुनानकजींचे विचार आजच्या काळातही सर्वांना मार्गदर्शक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गुरुनानक देवजी यांनी एकता, मानवता व शांततेचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी रविवारी केले.

गोविंदपुरा येथील दयासिंग गुरुद्वार्‍यात गुरुनानक यांची 544 वी जयंती मोठय़ा हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. या वेळी डॉ. संजीवकुमार बोलत होते. शीख, पंजाबी व सिंधी बांधवांमध्ये कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळेच जगाच्या कानाकोपर्‍यात या बांधवांनी औद्योगिक, शैक्षणिक, व्यवसाय व उद्योगधंद्यात वेगळा ठसा उमटवला असल्याचे डॉ. संजीवकुमार म्हणाले. त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

दिल्ली येथील गुरुविंदरसिंग पारस व माणिकसिंग यांनी कीर्तनाच्या माध्यमातून गुरुनानक यांचे जीवनचरित्र व त्यांचे आदेश सादर केले. व्हीआरडीईचे संचालक मनमोहनसिंग, कर्नल के. एस. मरवाह, जगजितसिंग गंभीर, गुलशन धुप्पड, बलदेवसिंग वाही, राजेंद्र चावला, अमरजितसिंग वधवा, अजय पंजाबी, बजिंदरसिंग, अमरिकसिंग, सुभाष जग्गी, हरवीर मफ्फर, स्वर्ण कुमार, मनीष नय्यर, राकेश गुप्ता आदी उपस्थित होते.

जयंतीनिमित्त गुरुद्वार्‍यात 13 ते 17 नोव्हेंबरदरम्यान अखंडपाठ, कीर्तन, कथा व भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात 71 जणांनी भाग घेतला. दशमेश परिवाराच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.

उपस्थितांचे स्वागत इंदरसिंग धुप्पड व कर्तारसिंग नारंग यांनी केले. सूत्रसंचालन हरजितसिंग वधवा यांनी केले, तर कार्यक्रमाच्या अखेरीस अजितसिंग भिंदर यांनी आभार मानले.