गुरुपुष्यामृत: यश, सफलता आणि सुख-समृद्धी देणारा योग, 24 तासांचा महामुहूर्त

प्रतिनिधी | Update - Oct 20, 2011, 04:26 AM IST

गुरुपुष्यामृत अर्थात गुरु पुष्य नक्षत्र आज आहे.

  • gurupushyamurut today

    नगर: गुरुपुष्यामृत अर्थात गुरु पुष्य नक्षत्र आज आहे. सर्वार्थ, अमृतसिद्धीसोबतच गजकेसरी असा सुवर्णयोग जुळून आल्याने या दिवसाला आगळे महत्त्व आले आहे. यश, सफलता आणि सुख-समृद्धी देणारा हा योग आहे. सकाळी 6.35 वाजेपासून ते दुस-या दिवशी 6.30 वाजेपर्यंत हा योग राहील. म्हणजेच 24 तासांचे महामुहूर्त. या शुभदिवसानेच दिवाळीच्या खरेदीलाही सुरुवात होणार आहे. बाजार बहरले आहेत. सोने-चांदीसह इतर धातू आणि जमीन, घरांची खरेदी तसेच इतर शुभकार्ये या मुहूर्तावर केल्यास त्यास स्थैर्य मिळून मांगल्य प्राप्त होते, असे ज्योतिष्यांनी म्हटले आहे. दिवाळीपूर्वी असा योग यापुढे 2014 मध्ये येईल.

Trending