आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm Affected Farmers Get Relief Fund In Nagar

जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना मिळणार २७ कोटींची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - फेब्रुवारी मार्च महिन्यात जिल्ह्यात झालेल्या गारपीट अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गारपीटग्रस्तांना २७ कोटी लाख २६ हजारांची मदत शासनाने िदली आहे. आठवडाभरात या मदतीचे वाटप सुरू होईल.

पाथर्डी, नगर, श्रीरामपूर, श्रीगोंदे, पारनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव, नेवासे, संगमनेर अकोले या तालुक्यांमध्ये फेब्रुवारीत अवकाळी पाऊस गारपीट झाली होती. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, चारापिके फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ते १४ मार्च या कालावधीत पुन्हा गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे ३६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान हे संत्रा, आंबा, मोसंबी, डाळिंब या फळबागांचे झाले होते. महिन्याभरानंतर १०, १२ १३ एप्रिल या कालावधीत झालेल्या पावसामुळे सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

जिल्हा प्रशासनाने या नुकसानाचे पंचनामे करून मदतीसाठी ३६ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. शासनाने गारपीटग्रस्तांसाठी विशेष बाब म्हणून २७ कोटी लाख २६ हजारांची मदत दिली. या मदतीचे वाटप महसूल यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. मदतीच्या वाटपाचे अधिकार तहसीलदारांमार्फत होणार असून, ३० जूनपर्यंत ही सर्व मदत वाटण्याचे निर्देश शासनाने िदले आहेत. शासकीय मदतीमुळे गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बँकखात्यात जमा होणार
अवकाळीपाऊस गारपिटीमुळे ३५ हजार हेक्टर क्षेत्राचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, ७१ हजार शेतकर्‍यांना त्याची झळ बसली आहे. सर्व मदत तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात येणार असून, या आठवड्याभरात शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मदत जमा होण्यास सुरुवात होईल.

मदत नव्या निकषाप्रमाणे ? शेतकर्‍यांमध्ये संभ्रम
पूर्वी५० टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाल्यास मदत देण्यात येत होती. मात्र, नव्या सरकारने जुन्या नियमात बदल करून ३३ टक्के नुकसान झाले, तरी मदत देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. मात्र, जिल्ह्याला मिळालेली ही मदत नव्या निकषाप्रमाणे मिळाली की जुन्या निकषप्रमाणे याबाबत संभ्रम आहे.

तालुकानिहाय मदत
- पाथर्डी : २८ लाख ७८ हजार
- नगर : ३७ लाख ५७ हजार
- श्रीगोंदे : ३२ लाख ३३ हजार
- पारनेर : 1 कोटी ७८ लाख ८४ हजार
- राहुरी : 4 कोटी ५४ लाख ५३ हजार
- राहाता : ४९ लाख ५२ हजार
- कोपरगाव : 5 कोटी ५० लाख हजार
- नेवासे : 7 कोटी १० लाख
- श्रीरामपूर :1 कोटी ४७ लाख
- संगमनेर : 5 कोटी ३३ लाख
- अकोले : 7 कोटी ३५ लाख