आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर गारपीटग्रस्तांच्या मदतीचे निकष बदलले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत गारपीटग्रस्तांच्या मदतीच्या निकषात बदल करुन नुकसान भरपाईत ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीबाबत यापूर्वीच्या सरकारची रि ओढता यात बदल करुन मदत देण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. याप्रकरणी गारपीटग्रस्तांच्या मदतीस नियम बदलाचा खोडा असे वृत्त दिव्य मराठीने (४ एप्रिल) प्रकाशित केले होते. त्या वृत्तात पूर्वीपेक्षा आता गारपीटग्रस्तांच्या मदतीत वाढ होणार असल्याचे म्हटले होते. या वृत्तानंतर मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

या नियम बदलण्याच्या प्रक्रियेला विलंब लागत असल्यामुळे नगर जिल्ह्यातील ७१ हजार गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.दरम्यान गारपीटग्रस्तांच्या मदतीचे निकष बदलण्याचा विचार सुरु असून,आता या मदतीत वाढ करण्यात येईल.असे महसूल मदत पुर्नवसन मंत्री एकनाथ खडसे यांनी एप्रिल रोजी दिव्य मराठी शी बोलताना सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नैसर्गिक आपत्तीतील बाधितांच्या पीक नुकसानीसाठी किमान ५० टक्के नुकसानीची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन निकषानुसार ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकरीही मदतीसाठी पात्र ठरवण्याचा निर्णय झाला. नुकसान भरपाईच्या प्रमाणातही ५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली.

१ लाख गारपीटग्रस्तांना मिळणार मदत
यापूर्वीच्या नियमाप्रमाणे जिरायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी हजार ५०० रुपये, बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी हजार रुपये बहुवर्षीय फळपिकांखालील क्षेत्रासाठी १२ हजार रुपये अशी दिली जात होती. आता मात्र सरकारने मदतीचे नियम बदलले असून, नव्या नियमाप्रमाणे जिरायत क्षेत्रासाठी हजार ८००, बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५००, फळबागांसाठी १८ हजार रुपये, अशी मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील लाखांहून अधिक शेतकर्‍यांना या नव्या निकषानुसार मदत मिळण्याची शक्यता आहे.