आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Handicap People Facing Problem In Government Hospital Nagar

अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात अपंगांची हेळसांड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा रुग्णालयाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या अपंगांना सध्या अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. दिवस-दिवस थांबूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याचे अपंगांनी सांगितले. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नाहक त्रास सहन करत जिल्हा रुग्णालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे गाºहाणे अनेक अपंगांनी बुधवारी मांडले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंगांना जिल्हा रुग्णालयाकडून प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जिल्हा रुग्णालयाकडून मिळणा-याप्रमाणपत्राशिवाय इतर पर्याय नसल्याने जिल्हाभरातून येणा-याअपंगांची रुग्णालयात गर्दी होते. दर बुधवारी हे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था जिल्हा रुग्णालयात करण्यात येते. प्रमाणपत्र काढण्यासाठी रुग्णालयात येणा-याअपंगांना थोड्याफार प्रमाणात कायमच अडचणींचा सामना करावा लागतो. बुधवारी हे प्रमाणपत्र काढण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावून थांबलेल्या अपंगांना बराच वेळ डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागली.

कोपरगाव, अकोले, जामखेड यासारख्या तालुक्यांमधून शंभरपेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास करून अपंग जिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, रुग्णालय प्रशासन त्यांच्याकडे संवेदनशीलतेने पाहत नसल्याचा अपंगांचा आरोप आहे.

संवेदनशीलतेने पहा
जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची वैधता संपलेली नसतानाही पुण्याच्या अपंग कल्याण आयुक्तांनी पुन्हा प्रमाणपत्र काढण्याचा फतवा काढला आहे. त्यामुळे प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी होत आहे. रुग्णालय प्रशासनाने अपंगांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. मात्र, याठिकाणी उलट चित्र पहावयास मिळत आहे, असे भाऊसाहेब वाघ म्हणाले.

आम्हाला नाहक त्रास
अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी गेल्या महिनाभरापासून चकरा मारत आहे. मात्र, प्रत्येकवेळी निराश होऊन परतावे लागते. अपंगांकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असताना रांगणा-याअपंगांना कोपºयात बसवले जाते. जन्मापासून अपंग असतानाही एक्स-रे रिपोर्टची मागणी केली जात आहे. ’’ लक्ष्मी देशमुख, बोधेगाव, शेवगाव.

सर्व काही सुरळीत
प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी होती. डॉक्टर सकाळपासूनच उपस्थित होते. जेवणाच्या वेळी किंवा दहा मिनिटांसाठी डॉक्टर दुसरीकडे गेल्यानंतर गोंधळ झाला असावा. अपंगांना त्रास होणार नाही, याची दक्षता रुग्णालय प्रशासन घेते. एकच दिवस असल्याने वाढत्या गर्दीत थोडाफार त्रास झाला असावा.’’ डॉ. आर. एम. कांबळे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक.

नवीन नियमांचा त्रास
रेल्वेकडून अपंगांना तिकीट दरात सवलत मिळते. प्रमाणपत्रावर हे काम होत असे. आता ओळखपत्रावर प्रमाणपत्राच्या नोंदणी क्रमाकांचा शिक्का मारून आणण्यास सांगण्यात आले. शिक्क्यासाठी पूर्ण दिवस थांबावे लागत आहे. ’’ बाळासाहेब लांडे, कोपरगाव.