आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंगांची हेळसांड संपेना, डॉक्टरांच्या अनुपस्थितीने अपंगांचा आक्रमक पवित्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाभरातून जिल्हा रुग्णालयात येणा-या अपंगांची हेळसांड संपायला तयार नाही. अपंगांनी अनेकदा त्रागा करूनही वरिष्ठ अधिकारी हा प्रश्न मार्गी लावण्यास तयार नाहीत. बुधवारी सकाळी केवळ डॉक्टर नसल्याने अपंगांना तब्बल दीड तास ताटकळत बसावे लागले. अपंगांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर यंत्रणा हलली व डॉक्टर पोहोचले.
अपंगत्वाचे प्रमाणपत्र फक्त जिल्हा रुग्णालयातच मिळते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून एक दिवस, बुधवार राखीव ठेवण्यात आला आहे. जिल्हा मोठा असल्याने अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी बुधवारची गर्दी नेहमीचीच झाली आहे. अस्थिरोग तज्ज्ञांवर जबाबदारी निश्चित करून बुधवारी ते उपस्थित राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, प्रमाणपत्र काढण्यासाठी दूरवरून येणाऱ्या अपंगांचा त्रास काही केल्या कमी होण्यास तयार नाही. ऐन गर्दीच्या वेळी डॉक्टरच उपस्थित नसतात, ही अपंगांची नेहमीची तक्रार आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता डॉ. संदीप तांदळे प्रमाणपत्र लिहिण्यासाठी तपासणी केबिनमधून बाहेर पडले. त्यानंतर आलेले डॉ. सुनील पोखरणा तपासणी अर्धवट सोडून सव्वाअकराला निघून गेले. अपंगाची बाहेर रिघ लागलेली असताना त्यांच्या तपासणीसाठी त्यानंतर दीड तास एकही डॉक्टर आले नाहीत. डॉक्टरांची प्रतीक्षा करून ताटकळलेल्या संतप्त अपंगांनी शेवटी आक्रमक पवित्रा घेतला. अपंगांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर यंत्रणा हलली. डॉ. तांदळे साडेबारानंतर तपासणी कक्षात पोहोचले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे आले. अपंगांनी त्यांना रोखून धरत डॉक्टरांच्या अनुपस्थितीबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. अपंगांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी डॉ. सोनवणे यांनी येथून पळ काढला. डॉक्टरांची अनुपस्थितीबाबत कारवाई करून यंत्रणा सुधारण्याची मागणी अपंगांकडून होत आहे.

अस्थिरोग िवभागाकडे पुरेसे डॉक्टर नसल्याचे कारण पुढे करून अपंगांना ताटकळत ठेवण्याचे प्रकार िजल्हा रुग्णालयात िनत्याचेच झाले आहेत. सध्या या िवभागात पुरेसे डॉक्टर असतानाही अपंगांना त्रास सहन करावा लागत आहे. िजल्हा रुग्णालयातील सेवेला दांडी मारून स्वत:च्या खासगी दवाखान्यात या िवभागाचे डॉक्टर व्यस्त राहत असल्याचे "िदव्य मराठी'ने उघडकीस आणले होते. त्यानंतर काही िदवस या िवभागाची सेवा सुधारली. मात्र, या िवभागाकडून रुग्णसेवा पुन्हा िवस्कळीत झाली आहे. वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
प्रमाणपत्राला हेलपाटे नको
आठवड्यातून एकाच दिवशी प्रमाणपत्र देण्याच्या पद्धतीमुळे अपंग बांधवांना जिल्हा रुग्णालयात हेलपाटे मारावे लागतात. एक दिवस असल्याने जिल्हाभरातून नागरिक येतात. त्यामुळे किमान दोन ते तीन वेळा चकरा मारल्याशिवाय कामच होत नाहीत, अशी अपंगांची तक्रार आहे. आठवड्यातून दोन दिवस प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करण्याची त्यांची मागणी आहे.