आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपंग कल्याणसाठी साठ लाखांचा खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अपंगांच्या कल्याणासाठी सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात. जिल्हा परिषदेला अपंग कल्याणासाठी मागील तीन वर्षांत प्रथमच सर्वाधिक 90 लाखांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी 60 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्या अखत्यारित अपंग कल्याण कक्ष कार्यरत आहे. या कक्षामार्फत सरकारच्या विविध योजनांचा अपंग समाजबांधवांना लाभ दिला जातो. या विभागामार्फत अपंगांसाठी स्टॉल टपरीचे वाटप करण्यात येते. त्यासाठी जिल्हाभरातून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत 2011-2012 या वर्षात अवघा चार लाखांचा निधी उपलब्ध झाल्याने फक्त 15 अपंग लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. 2012-2013 मध्ये या योजनेसाठी निधी नसल्याने लाभ देता आला नाही. 2013-2014 या वर्षात या योजनेसाठी 20 लाखांची तरतूद करण्यात आली. यासाठी 120 प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांची छाननी करून 78 जणांना टपरीवाटप करण्यात येणार आहे. यासाठी अपंग प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (32 हजारांच्या आत) रेशनकार्ड आदी कागदपत्रांची मागणी करण्यात आली. एका टपरीसाठी 25 हजार 707 रुपयांप्रमाणे वर्षा ट्रेडिंग कंपनीला टपर्‍यांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले. 29 अपंग शाळांतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासाठी सेस फंडातील तीन टक्के रक्कम उपलब्ध झाली. विजेत्या संघाची राज्यस्तरीय खेळासाठी निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धेत अंध मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. त्याबरोबरच तीनचाकी सायकलींसाठी 17 लाखांचा निधी मंजूर आहे. 60 लाभार्थ्यांना अपंग साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी 30 लाखांचा निधी उपलब्ध आहे.
9 अपंग शाळेत सोलर
विद्यार्थ्यांच्या स्नानासाठी कायमस्वरूपी गरम पाण्याची व्यवस्था व्हावी, याकरिता जिल्ह्यातील 9 अपंग विद्यालयांत सोलरबंब बसवण्यात आले आहेत. एका बंबासाठी 87 हजार 300 रुपयांप्रमाणे 10 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या बंबांची क्षमता 500 लिटर आहे.
यांनाच मिळेल टपरी
जिल्ह्यात अपंगांची संख्या मोठी आहे. मात्र, तुटपुंजा निधी येत असल्याने सर्वच पात्र लाभार्थ्यांना लाभ देता येत नाही. स्टॉल टपरी योजनेंतर्गत 120 प्रस्ताव असताना अवघ्या 78 गरजूंना लाभ देता येणार आहे. यासाठी यादीत ज्या गरजूंचे नाव सदस्य सूचवतील त्यालाच या योजनेचा लाभ मिळेल.