आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निराधार, बेवारस बालकांवर ‘हँडस् ऑफ होप’ माहितीपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्नेहालय संस्थेच्या स्नेहांकूर दत्तक विधान केंद्रावरील ‘हँडस् ऑफ होप’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा माहितीपट गुरुवारी (13 फेब्रुवारी) सायंकाळी 7 वाजता पाइपलाइन रस्त्यावरील माय सिनेमा इ-स्क्वेअरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


दत्तक विधानाची प्रक्रिया, त्याची सामाजिक कारणे, परिणाम याविषयी समाजात मोठे अज्ञान व असंवेदनशीलता आहे. दत्तक विधानाच्या कामाचे सकारात्मक पैलू, त्यातील आव्हाने, समाजाचा अपेक्षित प्रतिसाद याबद्दल व्यापक संवाद साधण्यासाठी या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा 40 मिनिटांचा माहितीपट 40 मिनिटांचा असून तो मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत आहे. लवकरच अन्य भाषांमध्ये तो उपलब्ध होईल. बेवारस, निराधार बालके, माता यांच्याकडे पाहण्याची समाजाची पारंपरिक दृष्टी या माहितीपटामुळे बदलायला मदत होईल, अशी अपेक्षा स्नेहांकूरच्या डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली.


नगरच्या कलावंतांची निर्मिती
देशभरातील अनौरस व बेवारस बालकांच्या कौटुंबिक पुनर्वसनासाठी ‘हँडस् ऑफ होप’ हा माहितीपट महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. या माहितीपटाची निर्मिती नगरचे कलावंत व तंत्रज्ञांनी केली आहे. इश्किया, गुलाब गँग या चित्रपटांसाठी साउंड इंजिनियर म्हणून जबाबदारी सांभाळणारे व राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरलेले कामोद खराडे यांनी या माहितीपटाच्या निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले आहे.