आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगावात अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला बेवारस अवस्थेत टाकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. हा प्रकार केडगाव एमआयडीसी परिसरात शुक्रवारी सकाळी उजेडात आला. कोतवाली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर समोर आले. कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
केडगाव एमआयडीसी परिसरात एक अडीच वर्षांची मुलगी जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, वैद्यकीय तपासण्यांनंतर मुलीवर बलात्कार झाल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कोतवाली पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत. परंतु, शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत पीडित मुलीच्या नातेवाईकांची माहिती मिळालेली नव्हती. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात अडचणी येत होत्या. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन कोतवाली पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.
बातम्या आणखी आहेत...