आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hard Punishment For Pregnant Women;s Harassment Issue

गर्भवती महिलेचा छळ: पतीसह तिघांना सक्तमजुरीची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गर्भवती विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथील मृत विवाहितेचा पती सचिन अशोक पतंगे, दीर बंटी अशोक पतंगे, सासू मीराबाई अशोक पतंगे या तिघांना श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी सहा वर्षांची सक्तमजुरी व साठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
जालना येथील अशोक बोधे यांची मुलगी कांचन हिचा विवाह 2009 मध्ये सचिनशी झाला होता. सासरच्या मंडळीनी माहेरून पैसे आणावे म्हणून तिचा छळ सुरू केला. वडील बोधे यांनी 50 हजार रुपये दिले. त्यानंतर महिनाभर सासरी तिला चांगले नांदवण्यात आले. पण नंतर पुन्हा छळ सुरू झाला. 14 डिसेंबर 2009 रोजी छळाला कंटाळून तिने विष घेतले. वडाळा बहिरोबा येथील मिशन रुग्णालयात उपचार सुरूअसताना कांचनचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक गोबाडे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले.
न्यायाधीश चव्हाण यांनी तिघा आरोपींना हुंड्यासाठी केलेल्या छळाबद्दल एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी आठ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास, तसेच आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून 5 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येक 12 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाच्या 60 हजार रुपयांच्या रकमेपैकी 50 हजार रुपयांची रक्कम मृत कांचनचे वडील अशोक बोधे यांना देण्याचा आदेश न्यायाधीशांनी निकालाबरोबर दिला.