आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार कारणीभूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. या दोन्हींचा मूत्रपिंडावर विपरित परिणाम होत आहे. नगर जिल्ह्यात पाण्याच्या काठिण्याचे (जास्त क्षार) प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मूत्रपिंडे निकामी होण्याचे प्रमाणही जास्त आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयात होणाऱ्या मूत्रपिंड रोपणाच्या शस्त्रक्रियांतील २० ते ३० टक्के रुग्ण नगर जिल्ह्यातील असतात, अशी माहिती प्रसिद्ध मूत्रपिंड रोपण तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन तन्वर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
डॉ. तन्वर यांनी नुकतेच नगर शहरात आली सेवा देण्यास सुरुवात केली आहे. डॉ. तन्वर मूळचे नगरचे. शिक्षणासाठी ते बाहेर गेले. त्यांनी केईएम रुग्णालयात मूत्रपिंड शस्त्रक्रियेत सर्वोच्च पदवी (एमसीएच) मिळवली. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे युरॉलॉजीवरील २२ पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना ‘डॉ. संजय ओक वेस्ट रेसिडेंट डॉक्टर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना ‘फेलो ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन्स’ ही शस्त्रक्रियेतील सन्मानही मिळाला आहे. प्रॅक्टिससाठी त्यांना अमेरिकेत निमंत्रण असतानाही त्यांनी आपल्या शहरवासीयांची सेवा करता यावी, म्हणून नगरचीच निवड केली. लवकरच ते मूत्रपिंड रोपणाच्या शस्त्रक्रियेची व्यवस्था नगरच्या एका रुग्णालयात सुरू करणार आहेत. सध्या ते त्यांचे सासरे डॉ. साताळकर रुग्णालयात सेवा देत आहेत. लवकरच ते वंध्यत्व निवारणाचे अँड्रॉलॉजी क्लिनिकही नगरला सुरू करणार आहेत. अशा प्रकारचे हे जिल्ह्यातील पहिले क्लिनिक असेल. डॉ. तन्वर यांच्यामुळे नगरमध्ये मूत्रपिंडाच्या विकारांवर अत्याधुनिक उपचार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
मूत्रपिंडांच्या वाढत्या विकारांबाबत बोलताना डॉ. तन्वर म्हणाले, नगर जिल्हाच मुतखड्याच्या विकाराने त्रस्त आहे. मूत्रपिंडांच्या विकारास चुकीच्या आहारपद्धतीही कारणीभूत ठरत आहेत. अलीकडील काळात काही लोक मांसाहाराचा अतिरेक करत आहेत. अतिरिक्त प्रोटिन (प्रथिने) सेवनाने त्यांची पातळी वाढते. तिचा मूत्रपिंडांवर ताण पडतो. त्यामुळे मूत्रपिंडे निकामी होण्याची शक्यता वाढते. चीज, पिझ्झा आदींच्या अतिसेवनानेही मुतखडा होण्याची भीती असते. स्थूल व्यक्तींना मुतखडा होण्याची शक्यता २५ टक्के अधिक असते.

कामांच्या सवयींचाही विपरित परिणाम मूत्रपिंडावर होत असल्याचे नमूद करून डॉ. तन्वर म्हणाले, दिवसाला किमान चार लिटर पाणी पिण्याची गरज असते. अधिक तापमान असताना घाम येतो, पण पाणी कमी पिण्याचा सवयी घातक ठरतात. याशिवाय वातानुकूलित दालनात काम करताना थंड वातावरणात पाणी कमी पिले जाते. त्याचा विपरित परिणाम शरीरावर होत असतो.

मुतखडा झाल्यानंतर उपचारांबद्दल ते म्हणाले, सध्या ‘शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी’ ही उपचार पद्धती अत्यंत सुरक्षित मानली जाते. या शस्त्रक्रियेत भूल देण्याचीही गरज नसते. शिवाय शरीराला कोठेही कापावे लागत नाही. एक ते दीड सेंटीमीटर व्यासाचा खडा भुगा करून बाहेर काढता येतो. या उपचार पद्धतीत रुग्ण २४ तासांत घरी जातो. अगदी दुसऱ्या दिवशी तो आपले दैनंदिन काम सुरू करू शकतो, असे त्यांनी नमूद केले. ही उपचार पद्धतीही त्यांनी नगरमध्ये सर्वप्रथम सुरू केली आहे. त्याचा फायदा नगरकरांना होणार आहे.

आजार टाळण्यासाठी हे करा...
}भरपूरपाणी पिणे }टोमॅटो, चीज, खारवलेले लोणी, चॉकलेट यांचे मर्यादित सेवन करणे }अतिरिक्त मांसाहार टाळणे }अंगदुखीसाठी वेदनाशमक गोळ्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये }मुतखड्यांचे दुखणे अंगावर काढून नका. कारण पाच मिलिमीटरच्या खड्यानेही मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो. }क्रिएटिनीनचे प्रमाण १.५ पेक्षा अधिक होऊ देणे }बोअरचे पाणी थेट पिऊ नये.
बातम्या आणखी आहेत...