आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणातील निकृष्ट गव्हाचा साठा नगरमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणातील निकृष्ट गव्हाचा साठा - Divya Marathi
हरियाणातील निकृष्ट गव्हाचा साठा
नगर- पावसामुळेखराब झालेल्या हरियाणातील निकृष्ट गव्हाचा पुरवठा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना केला जात अाहे. हा गहू खाण्यायोग्य नसल्याने ग्रामीण भागात या गव्हाचा वापर जनावरांच्या खाद्यासाठी केला जात आहे. दरम्यान, आलेल्या गव्हाची तपासणी करूनच तो उचलावा, असे आदेश राज्य सरकारने जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत.
गोरगरिबांना अल्प दरात अन्नधान्य मिळावे, या हेतूने शासनामार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना रुपये किलो गहू रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबे स्वस्त धान्य दुकानातून हे धान्य घेतात. अन्नधान्याबरोबर केरोसिनही कमी दरात दिले जाते. िजल्ह्यात या अन्नधान्याचे १४ लाखांहून अधिक लाभार्थी आहेत.

पावसामुळे खराब झालेला गहू सध्या लाभार्थींना दिला जात आहे. हरियाणा राज्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात गहू आेला होऊन त्याचा रंग उडाला होता. अवकाळीमुळे खराब झालेल्या गव्हाचे नुकसान होऊ नये, तसेच हरियाणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या हेतूने केंद्र सरकारच्या भारतीय अन्नधान्य महामंडळाने हा गहू खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
केंद्र सरकारने खरेदी केलेला हा गहू अन्नधान्य महामंडळाच्या नगर जिल्ह्यातील गोदामांत दाखल झाला आहे. पुरवठा विभागामार्फत हा गहू स्वस्त धान्य दुकानांना दिला जातो. जिल्ह्यातील काही भागातील स्वस्त धान्य दुकानांतून या खराब गव्हाचे वितरण रेशनकार्डधारकांना झाले आहे.
जिल्ह्यात एकूण १० लाख ५६ हजार शिधापत्रिकाधारक असून, ३१ लाख ३७ हजार लाभार्थी आहेत. एकूण स्वस्त धान्य दुकाने हजार ८३२ आहेत. जिल्ह्याला महिन्याला १० हजार मेट्रिक टन गहू हजार मेट्रिक टन तांदूळ लागतो. खराब झालेला गहू खाण्यायोग्य नसल्याने ग्रामीण भागात तो जनावरांना दिला जात आहे. बुधवारी जिल्हा पुरवठा विभागाने अन्नधान्य महामंडळातील गव्हाचे नमुने तपासणीसाठी घेतले.

नगरमध्ये केडगाव, नागापूर खडकी येथे महामंडळाची गोदामे आहेत. जो चांगला आहे, तोच गहू उचलण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाने वाहतूक प्रतिनिधींना दिल्या आहेत. हरियाणातून आलेला हा खराब गहू पुरवठा विभाग उचलणार नसल्यामुळे हा गहू पुन्हा अन्न-धान्य महामंडळाकडे जाणार आहे. त्यामुळे पेच आणखी वाढेल.

खराब गव्हाचे नमुने घेतले
अन्नधान्यमहामंडळाच्या गोदामात आलेल्या गव्हाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. प्रत्येक पोत्यातून हे नमुने घेण्यात आले आहेत. खराब गहू घेण्याचे आदेश शासनाने पुरवठा विभागाला दिले आहेत. गोदामातील खराब गहू उचलण्याचे निर्देश वाहतूक प्रतिनिधींना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर गोदामप्रमुखांना देखील या खराब गव्हाबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.'' राहुलजाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी, नगर.