आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांडग्याशी झुंज देऊन वाचवले अनेकांचे प्राण, दिवसभर सुरू होता थरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अनेकांना चावा घेतलेल्या पिसाळलेल्या लांडग्याला ग्रामस्थांनी अखेर यमसदनी धाडले. - Divya Marathi
छायाचित्र: अनेकांना चावा घेतलेल्या पिसाळलेल्या लांडग्याला ग्रामस्थांनी अखेर यमसदनी धाडले.
नगर - पिसाळलेल्या लांडग्याने नगर तालुक्यातील सारोळा कासार अकोळनेर परिसरात गुरुवारी गोंधळ घातला. या लांडग्याने एकापाठोपाठ एक सातजणांना चावे घेतले. गावातील ६५ वर्षांच्या वृद्धावरही लांडग्याने हल्ला चढवला, परंतु वाघाचे काळीज असलेल्या या वृद्धाने लांडग्याशी झुंज देत त्याला धरून ठेवले. नंतर गावकऱ्यांनी या लांडग्याला यमसदनी धाडले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथे लस उपलब्ध नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
पिसाळलेला लांडगा सकाळी अकोळनेर परिसरात आला. शेतात काम करणाऱ्या रावसाहेब विठ्ठल सोनवणे यांच्यावर लांडग्याने हल्ला चढवला. त्यात सोनवणे गंभीर जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. नंतर लांडग्याने आपला मोर्चा सारोळा कासारकडे वळवला. दिसेल त्याच्यावर तो हल्ला करू लागला. जनावरे कुत्र्यांनाही लांडग्याने चावे घेतले. इंदुबाई गंगाधर घोडके, बानू पाशाभाई शेख, तान्हुबाई खलाटे, भामाबाई जयवंत कडूस यांना लांडगा चावल्याने ते गंभीर जखमी झाले. पाच वर्षांच्या तन्वीर शेख याच्यावरही लांडग्याने हल्ला चढवला.
गावातील ६५ वर्षांचे नामदेव भिकाजी धामणे स्टेशनकडे जात असताना पाठीमागून आलेल्या लांडग्याने त्यांच्यावर झेप घेतली. त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असताना लांडग्याच्या जबड्यात त्यांच्या हाताचा अंगठा अडकला. लांडगा चावा घेत असताना मोठ्या धाडसाने धामणे यांनी लांडग्याला जमिनीवर लोळवत त्याच्याशी झुंज दिली. काही वेळातच गावकरीही तेथे पोहोचले. संतप्त जमावाने पिसाळलेल्या लांडग्याला यमसदनी धाडून हा थरार संपवला. लांडग्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सातजणांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. लहानग्या तन्वीरच्या डोक्यावर तोंडावर गंभीर जखमा झाल्याने त्याला तातडीने पुण्याला हलवण्यात आले. नगर-नेवासे वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी राजेंद्र कांबळे, वनरक्षक अंकराज जाधव, वनरक्षक रामा कुताळ सखाराम येणारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वाळकी येथील पशु दवाखान्यात लांडग्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
गावकऱ्यांमुळे प्राण वाचले
माझी आजी सत्तर वर्षांची आहे. शेतात घास कापण्यासाठी ती गेली असताना लांडग्याने हल्ला केला. नंतर लोक जमा झाल्याने आजीचे प्राण वाचले. वसंत कडूस, नागरिक.
पुढे वाचा.. माझा हात लांडग्याच्या जबड्यात अडकला...