आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साथीच्‍या रोगावर नियत्रण; नवरात्रात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरात पसरलेली काविळीची साथ व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केडगाव व बु-हाणनगर येथे उत्सवात मोठी यात्रा भरते. तेथे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येतात. यात्रेच्या माध्यमातून काविळीची साथ पसरू नये, याची पुरेपूर दक्षता घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील पिण्याचे पाणी क्लोरीनयुक्त असावे याची दक्षता घ्यावी, खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी स्वच्छ आहे का याची खात्री करावी, असे पत्रकात म्हटले आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर वापरण्यात येणारे पाणी तपासण्यासाठी मनपातर्फे स्वच्छता निरीक्षक व मदतनीसांचे पथक नेमण्यात आले आहे. या पथकामार्फत दररोज सकाळी व सायंकाळी खाद्यपदार्थांच्या स्टॉलची तपासणी करण्यात येईल. पिण्याच्या पाण्याची "ओटी टेस्ट' करून त्रुटी आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे, तसेच पिण्यासाठी घरचे पाणी वापरावे, असे आवाहन डॉ. राजूरकर यांनी केले आहे.
हायटेक बुलेट
मनपाच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन तयार केलेली दोन अग्निशमन सिलेंडर असलेल्या हायटेक बुलेट दाखल झाल्या आहेत.