आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health News In Marathi, Trainer Sagar Surpure Teach Exercise, Divya Marathi

लंडनमधील ‘बूट कॅम्प’चे प्रशिक्षण नगरमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लंडनमधील स्टायनर संस्थेत प्रशिक्षण घेऊन आलेले सागर सुरपुरे आता नगरमधील युवकांना ‘बूट कॅम्प’ हे नवे तंत्र वापरून फिटनेसचे धडे देत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

नगर शहरातील जिमची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यामुळे युवापिढीतही फिटनेस आणि बॉडी बिल्डिंगची क्रेझ निर्माण झाली आहे. नवरंग व्यायामशाळेजवळ राहणार्‍या सागर यांनी योग शिक्षकाच्या पदविकेसह विविध मान्यवर संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन 2011 मध्ये ‘बलसागर फिटनेस क्लब’ सुरू केला. नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांना बीएफवाय स्पोर्टस्कडून इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. भारतातून केवळ पाचजणांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. व्हेनझिमर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ट्रेनरकडून मिळालेले प्रशिक्षण आटोपून सागर नुकतेच परतले असून त्यांनी तेथे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या क्लबमध्ये करण्यास सुरुवात केली आहे.

लंडनमध्ये ‘बूट कॅम्प’ हा कोणत्याही साधनाशिवाय करता येणारा व्यायामप्रकार शिकता आला, असे सांगून सागर म्हणाले, या प्रकारात पूर्ण शरीराचा व्यायाम करता येतो. त्यामुळे चरबी कमी होऊन स्नायूंची ताकद वाढवता येते. हृदय व पायांच्या स्नायूंचा व्यायाम एकाचवेळी यात होतो. हृदयाची क्षमता वाढवण्यासाठी, तसेच वजन कमी करण्यासाठी ‘बूट कॅम्प’ उपयुक्त ठरते. हा व्यायामप्रकार सागर आता नगरच्या युवकांना शिकवत आहेत.
आपल्याकडे काहीजण स्नायू कमावण्यासाठी वेगवेगळ्या पावडरचा वापर करतात. तथापि, त्याऐवजी कच्च्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश आहारात करणे जास्त चांगले, असे सागर यांनी सांगितले.

नैसर्गिक गोष्टींवर भर
पाश्चिमात्त्य देशांत फास्टफूडच्या अतिरिक्त सेवनामुळे वजन वाढण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात आहे. तथापि, आता तेथील 20 ते 40 दरम्यानची युवा पिढी आरोग्याविषयी अधिक सतर्क झाली असून फिटनेस राखण्याकडे विशेष लक्ष देत आहे. त्यासाठी ते डेटोक्सिफिकेशनवर भर देतात. नैसर्गिक गोष्टींकडे त्यांचा कल वाढत आहे. अनेक जणांनी मांसाहार सोडून शाकाहार सुरू केला आहे. लंडनमध्ये योगासनांची क्रेझ वाढत असून रामदेवबाबांचे अनेकांना आकर्षण आहे, असे सागर यांनी सांगितले.